स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने सह्याद्री फार्मसीने राबवले विविध सामाजिक उपक्रम

रक्तदान, अमलीपदार्थ विरोधी प्रतिज्ञा, वृक्षारोपण,रांगोळीस्पर्धा उत्साहात संपन्न
सांगोला (कटुसत्य वृत्त):- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाने विविध समाजउपयोगी उपक्रम राबवले.या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवदिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील,कै.अभिजित कदम विद्यालय मेथवडेचे प्रभारी प्राचार्य श्री.डी.एन जाधव व त्यांचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ,सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थित झाले.महाविद्यालयात, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने तीन दिवसामध्ये विविध उपक्रम राबवले.हर घर तिरंगा,तिरंगा रॅली,विविध सामाजिक उपक्रम जसे कि रक्तदान,वृक्षारोपण,रांगोळीस्पर्धा. विद्यार्थ्यांनी व सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले बहुमोल योगदान दिले.या रक्तदान उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला.याबरोबरच महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण व संवर्धन केले त्यामुळे परिसर वृक्षमय झाला.तसेच महाविद्यालयांत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते,विविध समाजप्रभोधनपर विषयावर रांगोळी विद्यार्थ्यांनी काढली होती.त्यास विदयार्थ्यांनी उत्सफूर्त सहभाग दर्शिवला. तसेच विद्यार्थ्यांना व उपस्थितांनी अमली पदार्थ सेवन विरोधी शपथ घेतली . हे उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यास महाविद्यलाय सांस्कृतिक विभागाचे प्रा.भारत गरंडे,डॉ.एम.जी.शिंदे,प्रा.आर.एम.कोळी यांचे योगदान लाभले.
No comments:
Post a Comment