अत्याधुनिक प्रयोगशाळेचे राजुरी येथे उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 16, 2022

अत्याधुनिक प्रयोगशाळेचे राजुरी येथे उद्घाटन

अत्याधुनिक प्रयोगशाळेचे राजुरी येथे उद्घाटन

            सांगोला (कटुसत्य वृत्त): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चे औचित्य साधून दि 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथे आधुनिक अशा सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन राजुरी गावच्या सरपंच प्रतिभाताई व्हळगळ  यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपसरपंच  महेश काटे  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सूर्यकांत खुळे उपाध्यक्ष सौ संपदा दबडे व शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य लक्ष्मी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काटे सर व त्यांचे सर्व स्टाफ   प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातही नसेल अशी   प्रयोगशाळा पाहून सर्वांनी खूप मोठे समाधान व्यक्त केले या प्रयोगशाळेत इयत्ता पहिली पासून ते सातवी पर्यंत चे सर्व प्रयोग करता येतात याशिवाय अधिक ज्ञान देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या प्रयोगशाळेची संपूर्ण जबाबदारी विज्ञान शिक्षक श्री दिनेश गव्हाणे सर यांनी घेतली असून त्याचा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे शाळेचे मुख्याध्यापक तानाजी साळे व विज्ञान शिक्षक  श्री गव्हाणे सर यांनी उपस्थितांना प्रयोगशाळे बद्दल संपूर्ण माहिती दिली सर्वप्रथम  प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली ग्रामपंचायत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला नंतर भाषने घेण्यात आली व त्यानंतर टिपरी नृत्य देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली ग्रामपंचायत राजुरी  यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला व त्यानंतर पालक सभा व शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली  त्यामध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर माननीय दिलीप स्वामी  साहेबांचे दशसूत्री कार्यक्रम पालकांचे सहकार्य ग्रामपंचायतीचे सहकार्य ग्रामस्थांचे सहकार्य याबाबत चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग कसा वाढवता येईल या बाबत  चर्चा करून निर्णय घेण्यात आले शेवटी सर्वांना चहापान करून कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages