जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर-गवळी वस्ती (तरंगेवाडी) येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला (कटुसत्य वृत्त): सोमवार दि १५/०८/२०२२. रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर-गवळी वस्ती (तरंगेवाडी) येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः सेवानिवृत्त सैनिक श्री. अशोक गवळी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर झेंडा कवायत, बैठे कवायतीनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देश रंगीला या गाण्यावर लेझीम नृत्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. इ. १ली ते इ. ७वीचे विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत भाषणे सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. तद्नंतर शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे (पतंग उडवणे, नागोबा बनविणे) बक्षीस वितरण पाहुण्यांच्या व शिक्षकवृंदांच्या हस्ते करण्यात आले. सदर बक्षीस हे शाळेतील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक श्री. खुशालद्दीन शेख सरांच्या वतीने होते. तद्नंतर गुरुकृपा ट्रॅव्हल्स जवळा चे मालक व माणूसकी प्रतिष्ठान सांगोला तालुक्याध्यक्ष श्री. अमोल कावळे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप(२वही,पेन्सिल,खोडरबर, शाॅर्पनर) करण्यात आले. तद्नंतर शाळेतील उपक्रमशील विज्ञान पदवीधर शिक्षक श्री. गणेश व्हनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित पालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. गणेश व्हनखंडे सरांनी शाळेतील इ. १ली ते इ. ७वी तील २अनाथ,गरीब, होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. सुहास कुलकर्णी सरांनी केले तर आभार श्री. सुशांत शिंत्रे सरांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. गणेश व्हनखंडे सर, श्री. श्रीमंत गावडे सरांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास शाळेतील माजी विद्यार्थी, बहुसंख्य पालक उपस्थित होते. शेवटी खाऊ वाटपांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment