अर्धनारी येथे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 16, 2022

अर्धनारी येथे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला

अर्धनारी येथे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला

               घोड़ेश्वर (कटुसत्य वृत्त):- मौजे अर्धनारी तालुका मोहोळ येथे भारत देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्षे झाल्याबद्दल अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय झेंडूंच्या फुलांनी व फुग्यांनी सजविन्यात आले होते, पहाटे पासून देशभक्तिपर स्पीकरवर गानी लावण्यात आली होती, झेंड्याच्या कड़ेने संपूर्ण रांगोळी, भारताचा तिंरगी नकाशा काडन्यात आला होता.

               जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्धनारी येथिल विद्यार्थ्यांनी हातात तिरंगी झेंडे घेवून गावातून प्रभातफेरी काढ़ून ‘भारत माता की जय’,  ‘वन दे मातरम्’ , ‘विर जवान तुझे सलाम’ अशा अनेक देश भक्तिपर घोषणा देन्यात येत होत्या. प्रभात फेरी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आल्यानंतर अर्धनारीच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. सुनंदाताई संतोष पवार यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आले,राष्ट्रगीत, प्रतिज्ञा घेण्यात आले नंतर प्रभात फेरी जिल्हा परिषद शाळेत येवून येथिल कार्यक्रम घेण्यात आला शाळेतील ध्वज वंदन शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रोहिणी विक्रम पवार यांच्या हस्ते करण्यात आले व इयत्ता आंगणवाड़ी, १ ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

               अर्धनारी गावातील आंगणवाड़ी क्रमांक २ ही शासनाच्या स्मार्ट आंगणवाड़ी योजनेत बसल्याने या आंगणवाड़ीसाठी स्टडीटेबल, पाणी बॉटल्या, वॉटर फिल्टर, फाॅन , सौर उर्जेवर चालनारी एलईडी टीवी, पाणी टाकी अशा अनेक वस्तू शासनाकडून देन्यात आल्या आहेत या सर्व वस्तूंचे पूजन अर्धनारी गावच्या सरपंच सौ. सुनंदादेवी संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

               यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रोहिणी पवार, सदस्या दाढे, पाटील मॅडम, बेळे मॅडम, सोनार मॅडम, शिवशरण मॅडम, साळवे मॅडम, भाजपचे जिल्हा सरचिटनीस बाळासाहेब पवार, मिस्टर सरपंच संतोष पावर, आण्णासो जाधव, पांडुरंग पवार, मेजर चंद्रकांत सुरवसे, गालफाड़े सर, रमेश पाटील, सचिन जाधव, मुकुंद कूचेकर, गणेश दाढे, सुहास पवार, गणेश माने, अमोल पवार, नाना पवार, राजकुमार पवार, सिध्देश्वर सुरवसे, अक्षय जाधव, दिनेश सुरवसे, संदीप पवार, संतोष सरवळे, बिरु निकम, चंद्रकांत गवळी, नाना पवार, आदित्य पवार, उमेश पवार, बाळासाहेब पाटिल, समाधान गवळी, शेखर पवार, शंभुराजे (मोनू) पवार, रूपेश पवार, म्हाळाप्पा कोळी, नागेश साळवे, सुरेश चंदनशिवे, उपस्थित होते, आभार महेश पवार यांनी मानले. ग्रामसेवक कैलास पवार व ग्रामपंचायत कर्मचारी बाबा कोळी, गोपिनाथ जाधव, दिगंबर अंकुशराव व गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages