सांगोला आर्थिक परिस्थिती सुधारली, शासकीय धान्य योजनेतून दोन कुटुंबीय पडले बाहेर

सांगोला (कटुसत्य वृत्त): शासन निर्णय क्र अधापु-२०१६ /प्र.क्र.१३९/ना.५/२२ दि.१९ ऑक्टोबर २०१६ अन्वये महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मा. त्रिगुण कुलकर्णी सर (पुरवठा) पुणे विभाग पुणे यांनी अन्नधान्याच्या अनुदान योजनेतून परिस्थिती सुधारलेल्या कार्डधारकांनी स्वत:हून बाहेर पड़ा (Opt out of subsidy of Foodgrains) असे जाहीर आवाहन केलेले आहे शासन रक्कम भरून शियापत्रिका द्वारे दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किल तांदूळ या दराने कार्डधारकांना रेशनदुकानातून धान्य दिले जाते परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांनी कार्ड जमा करून स्वत:हून योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन केलेले आहे त्यास प्रतिसाद म्हणून सांगोला तालुक्यातील वझरे येथील शंकर बाबु गुरव वझरे आणि दत्तात्रय हरिबा गुरव या कार्ड धारकांनी स्वतःहून आर्थिक परिस्थिती सुधारल्याने योजनेतून बाहेर पडत असलेबाबत विहित नमुन्यात फॉर्म भरून देवून, यापुढे धान्य देवू नये असे निवेदन मा.श्री अभिजीत पाटील तहसिलदार सांगोला यांचेकडे १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनदिवशी समक्ष येवून दिलेले आहेत.
तहसिलदार यांनी वरील कार्डधारकांचे शासनाचे वतीने आभार मानले यावेळी श्री किशोर बडवे निवासी नायब तहसिलदार श्रीमती ए.एस.दराडे. पुरवठा निरीक्षक हजर होते ,तरी कार्डधारकांनी दिनांक २०/८/२०२२ पर्यंत पुरवठा फॉर्म शाखेत जमा करावेत, जेणेकरून त्यांचे धान्य सांगोल्यातील गरजवंत गोरगरिबांना शासनाला वाटप करता येईल .उच्च उत्पन्न गटातील कार्ड धारकांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडावे अन्यथा तपासणीत आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल..पुरवठा निरीक्षक मार्फत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत..त्यामुळे सधन कुटुंबाचे कार्डधारकांनि आपले कार्ड जमा करून स्वेच्छेने धान्यावरील आपला हक्क सोडावा असे जाहीर आवाहन मा. श्री अभिजीत पाटील तहसिलदार सांगोला यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment