कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वातंत्र्याय दिन उत्साहात साजरा

सांगोला (कटुसत्य वृत्त): कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैल चित्रास माजी मुख्याध्यापक मा.वा कोळेकर सर तसेच इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक विसापुरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी शिक्षक-विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर यांनी ध्वजास मानवंदना दिली. भांगरे सर व नागरसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन झाले.त्यानंतर अशोक सरगर सर यांनी 75 वर्षात झालेल्या भारत देशाच्या उन्नती बाबत आपले मनोगत व्यक्त करत भारताची वाटचाल हि विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे होत असल्याचे प्रतिपादन केले.त्यानंतर प्रशाला व जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला.
इंग्लिश मीडियम मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन व नृत्य सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच इंग्लिश मिडीयम मधील विद्यार्थ्यांची यावेळी परेड सादर करण्यात आली. क्रीडा शिक्षक नरळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी बैठे कवायत प्रकार केले.दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निम्मित" हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या संपूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री. गडहिरे सर, श्री.भांगरे सर, कु.नागरसे मॅडम, श्री. तेली सर, सौ.देशमुख मॅडम, श्री. टी. टी सरगर सर, कु.तांबोळी मॅडम, कु.सरगर मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.सर्व स्पर्धांमध्ये क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.हायस्कूल व ज्यु काॅलेज मधील सर्व विद्यार्थ्यांना सांगोलातालुका शिक्षण प्रसारक मंडळ व ग्रामपंचायत कोळा मार्फत खाऊवाटप करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमासाठी कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक/ प्राचार्य श्री. विसापुरे सर, पर्यवेक्षक. श्री. मणेरी सर, इंग्लिश मिडीयम चे मुख्याध्यापक श्री. विनोद देशमुख सर प्रशाले चे माजी मुख्याध्यापक मा.वा कोळेकर, सर,पोरे सर, मोहिते सर माजी पर्यवेक्षक. एल.वाय.देशमुख,सर माजी सह शिक्षक करांडे सर, सहशिक्षिका नकाते मॅडम, तसेच कोळा गावातील प्रतिष्ठित नागरिक, कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे माजी विद्यार्थी. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मारुती सरगर यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री. एस डी शिंदे सर सर यांनी केले.
No comments:
Post a Comment