सांगोल्यात भाजपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त जिलेबी वाटप

सांगोला (कटुसत्य वृत्त): देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सांगोल्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जयभवानी चौकात मुस्लिम बांधवासह नागरिकांना तसेच इंदिरानगर मधील मुले व नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आली.
यावेळी भाजपचे वसंत सुपेकर, विष्णुपंत केदार, सुरेश चौगुले, राजू शिंदे, अनिल शिंदे, संजय केदार, विनायक सोनावले, दिनेश भोसले, दिपक केदार, पप्पू पाटील, शंकर केदार, विनोद काटकर, राहुल केदार, सागर गायकवाड, दीपक केदार, सोयजीत केदार, सुरेश बुरांडे, सौरभ केदार, विवेक केदार, गणेश केदार आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment