मोहोळ नगरपरिषदेतील शौचालय घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करा

सामाजिक कार्यकर्ते संतोष सोलनकर यांची निवेदनाद्वारे मागणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त): मोहोळ नगर परिषदेच्या माध्यमातून मोहोळ शहर साठी शौचालयदेण्यात आले आहे. यामध्ये वैयक्तिक शौचालयाच्या कामांमध्ये 2019 ते 2022 या कालावधीमध्ये १४ वा वित्त आयोग या निधीमधून पाच कोटी तेवीस लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. या कामाची चौकशी करून ठेकेदार वर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते संतोष सोलनकर यांनी मुख्याधिकारी योगेश डोके यांना दिला आहे.
मोहोळ शहरात चौदावा वित्त आयोग या निधीतून वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहे. यामध्येशौचालय किती बांधण्यात आली आहेत त्यांना अनुदान किती मिळते अनेक ठिकाणी शौचालय बांधलेला फोटो नाही परंतु त्याची बिले काढण्यात आली आहे. या कामातील ठेकेदार व दलाल यांनी एकाच जागेवर दोन ते तीन शौचालय बांधले आहेत अशी खोटी कागदपत्रे बनवून बिले काढण्यात आले आहेत. पूर्वी स्वतः बांधलेली वैयक्तिक जुनी शौचालय बांधलेली असलेल्या लाभार्थ्यांनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. खुल्या जागेमध्ये शौचालय बांधले असल्याचे दाखवून ठेकेदार आणि दलाल यांच्या संगनमताने बील काढण्यात आले आहे. याची चौकशी करून त्यांच्यावर १० दिवसात करण्या कारवाई करण्यात यावी अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष सोलंकर यांनी निवेदनाद्वारे दिला.
No comments:
Post a Comment