शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने मिरज - परळी एक्सप्रेसचे जोरदार स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 16, 2022

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने मिरज - परळी एक्सप्रेसचे जोरदार स्वागत

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने मिरज - परळी एक्सप्रेसचे जोरदार स्वागत


            सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने गाडी क्रमांक 11411मिरज- परळी एक्सप्रेस या रेल्वेचे सांगोल्यात 15 ऑगस्ट रोजी उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले.

            सांगोला रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे आल्यानंतर प्रारंभी रेल्वेस पुष्पहार चढवण्यात आला, रेल्वेचे पायलट मनीष कुमार ,राजेश माने यांचा सत्कार करून मिठाई, पेढे वाटून स्वागत करण्यात आले.

            गेल्या तीन वर्षापासून कोरोना काळात सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने गेल्या अनेक महिन्यापासून या रेल्वे सुरू कराव्यात म्हणून पाठपुरावा केला होता त्याची दखल घेऊन रेल्वे विभागाने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सव निमित्त या रेल्वे सुरू केल्या असून येथील प्रवाशांना लातूर, परळी वैजनाथ या ठिकाणी जाण्याची प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. मिरज -परळी रेल्वेमुळे ढालगाव, सांगोला ,पंढरपूर येथील प्रवाशांचे मोठी सोय होणार आहे. या गाडीमुळे कुर्डूवाडी जंक्शन या ठिकाणी मध्यरात्री पोचल्यावर सिद्धेश्वर एक्सप्रेस ,लातूर मुंबई एक्सप्रेस यासह दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळणार असून प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे परिणामी पुणे ,मुंबईचा प्रवास सुखकर व आरामदायी होणार असून वेळेचीही बचत होणार आहे.

            यावेळी रेल्वे स्टॉफ ,प्रवासी, शहरातील नागरिक व शहीद अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages