स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कुर्डूवाडीत उत्साहात साजरा..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 16, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कुर्डूवाडीत उत्साहात साजरा..!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कुर्डूवाडीत उत्साहात साजरा..!

           कुर्डूवाडी ( कटुसत्य वृत्त) :- स्वातंत्र्याचे ७५ व्या अमृत महोत्सव शासकीय व निमशासकीय संस्था व सामाजिक राजकीय पक्षाच्या वतीने सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.शहर परिसरात हार घर तिरंगा,घर घर तिरंगा डवलाने फडकताना दिसला. 

           कुर्डूवाडी नगरपालिकेत प्रांताधिकारी ज्योतीताई कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शहर परिसरात टिळक चौक येथे मुख्याधिकारी लक्ष्‍मण राठोड,कुर्डूवाडी पोलीस स्टेशन येथेेे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे तर गांधी चौक येथे डॉ.जयंत करंदीकर,आझाद मैदान डॉ.विलास मेहता,कै.आ.कृष्णराव परबत वाचनालय,येथे ज्येष्ठ परिचारिका इंदुताई तेलंग या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

           माढा तालुका पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहणानंतर सर्व कर्मचारी अधिकारी यांनी शहर परिसरातून देशभक्तीपर नारे देत प्रभात फेरी काढली.यामध्ये ग्रामीण रुग्णालयासह नगरपालिका व पोलीस स्टेशन येथील कर्मचारी अधिकाऱ्यांनी देखील सहभाग नोंदविला.

           भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर बागल यांनी हा महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला.श्रमिक कष्टकरी गोरगरीब श्रम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन रस्त्यावरती खडी फोडणार्‍या मजुरांना मिठाई वाटप करून त्यांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज देऊन हा महोत्सव साजरा केला यावेळी सचिन गायकवाड आनंता राऊत सह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages