गजानन महाराज पालखीचे माचनूर गावात सरपंचानी केले स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 9, 2022

गजानन महाराज पालखीचे माचनूर गावात सरपंचानी केले स्वागत

 गजानन महाराज पालखीचे माचनूर गावात सरपंचानी केले स्वागत

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):–दोन दिवसापूर्वी संतांची भूमि म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढे नगरीच्या माचनूर प्रवेशद्वारात शेगांव येथिल गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ_मृदुंगांच्या निनादावर गण गण गणात गोते, विठोबा, ज्ञानोबा, तुकारामांच्या जयघोषात, मंगलमय वातावरणात आगमन झाले,

गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत माचनूरच्या विद्यमान कर्तव्यदक्ष सरपंच सौ.पल्लवी प्रकाश डोके, तहसिलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बामने, डॉ. नंदकुमार शिंदे, कर्तव्यदक्ष उपसरपंच उमेश डोके, मा.सरपंच विलास डोके, प्रसिद्ध द्राक्ष बगायतदार जालिंदर डोके,राहुल डोके, अजित मोहिते, ग्रामसेवक संजय शिंदे, गोरख जगताप, वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

53 वर्षे परंपरा असलेल्या गजानन महाराजांच्या पालखीचा   मुक्कामी विसावा सिद्धेश्वर मंदिरात माचनूर येथे असतो, त्यामूळे येथे भाविकभक्तांनी  गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने सिद्धेश्वर मंदिराला यात्रेचे स्वरूप आले होते.गजानन महाराजांचा जयजयकार करित अश्व, रथ, मेना, भालदार, चोपदार अशा राजवैभवी थाटात या पायदळी शेगांव ते पंढरी वारीत 600 ते 700 पेक्षा अधिक टाळकरी, पताकाधारी दुतरफा वारकारी सहभागी झालेले असतात हा नयनरम्य सोहळा डोळयाचे पारणे फेडनारा असतो त्यामूळे माचनूर पंचक्रोशीतील अर्धनारी, ब्रम्हपुरी, बेगमपुर, रहाटेवाडी, वडदेगाव, बठाण,मंगळवेढा आदि भागातील भाविकभक्तांनी मोठ्या प्रमाणात  गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages