तडवळे येथील जिल्हा परिषद शाळेचा धबधबा कायम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 9, 2022

तडवळे येथील जिल्हा परिषद शाळेचा धबधबा कायम

 तडवळे येथील जिल्हा परिषद शाळेचा धबधबा कायम

कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळा व जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा या दोन्ही शाळांनी जवाहर नवोदय परीक्षेत बारा विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यशाचे शिखर म्हणून राज्यात ओळखली जाणारी कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येथील पाच मुलींनी तर जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा येथील सात विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय परीक्षेत यश मिळवून पुन्हा तडवळा पॅटर्न तयार केला आहे. Covid-१९ सारखे महा भयंकर संकट असताना सुद्धा दोन वर्ष पूर्णपणे बंद असून सुद्धा शाळेने शाळा स्तरावर covid-१९ चे पूर्ण नियमाचे तंतोतंतपालन करून ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने शिक्षण घेऊन यश मिळवले जिल्हा परिषद कन्या शाळेतील कु. कार्तिकी नागनाथ माळी, पोर्णिमा बालाजी भांड, स्वरंगी मिलिंद भालेराव, सिद्धी अशोक शिंदे, तनिष्का संदीप मगर या मुलींनी तर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथील कु. प्रसाद अमोल डुमणे, मनीष मंगेश पाटील, आर्यन अनिल शिरसागर, यश नागनाथ डुमणे, रुद्राक्ष राजेंद्र कोळी, स्पंदन कालिदास गायकवाड, देवांश रमेश कांबळे, या विद्यार्थ्यांनी यश पटकावले आहे या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आर एस सय्यद, शिक्षक जे एल धायगुडे, एस आर पुरी,बाळासाहेब जमाले, शिक्षिका अपराध मॅडम, जमदाडे मॅडम व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले या यशाचे खरे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे शिक्षक जे एल धायगुडे सर यांचे तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे गावातून व परिसरातून कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages