पंढरीतील शिवसैनिकाच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फराळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 9, 2022

पंढरीतील शिवसैनिकाच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फराळ

पंढरीतील शिवसैनिकाच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फराळ


मुख्यमंत्र्यांनी  महेशनाना साठे यांचे स्वीकारले आमंत्रण

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये येत आहेत. याचदिवशी त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख महेश साठे यांच्या घरी ते विसावा घेणार आहेत. याचवेळी ते फराळ करणार असल्याची माहिती , महेश साठे यांच्याकडून देण्यात आली आहे.
राज्यातील शिवसेनेचा मोठा गट भाजपाबरोबर गेला. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. शिवसेनेत असल्यापासूनच महेश साठे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध होते. जिल्हा उपाध्यक्षपदाचा काळ संपूनही महेश साठे यांचा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चांगला संपर्क होता. एकनाथ शिंदे यांचे सोलापूर जिल्ह्यातील निकटवर्तीय म्हणून महेश साठे यांचा नावलौकिक होता. मुख्यमंत्री म्हणून श्रीविठ्ठलाची महापूजा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले. यानंतर लगेचच महेश साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाऊन भेट घेतली. त्यांच्या पंढरपूर दौऱ्यात फराळासाठी घरी येण्याची विनंती केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ यास मान्यता दिली.
पंढरपूर मधील लक्ष्मी टाकळी रोडवर महेश साठे यांचे फार्म हाऊस आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या फराळाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महेश साठे यांनी दिली आहे. महेश शिंदे यांच्या या आमंत्रणामुळे जिल्ह्यातील शिवसेनेत खळबळ उडाली आहे. महेश साठे यांना मानणारा जिल्ह्यात मोठा गट शिवसेनेत कार्यरत आहे. महेश साठे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सलगी जिल्ह्यातील शिवसेनेसाठी धोकादायक तर ठरणार नाही ना ? अशी परिस्थिती शिवसेनेच्या गोटात निर्माण झाली आहे.

सुदाम्याचे आमंत्रण श्रीकृष्णाने स्वीकारले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या महापूजेसाठी पंढरीत येत आहेत. पंढरीतील शिवसेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश साठे हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले. लागलीच महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या पंढरपूर दौऱ्यात आपल्या घरी फराळासाठी येण्याचे आमंत्रण त्यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी ते तात्काळ स्वीकारले. आपल्या समर्थकाची इच्छा पूर्ण करण्याचे वचनही दिले. सुदाम्याचे आमंत्रण श्रीकृष्णाने स्वीकारल्याचा आनंद आपणास, झाल्याची प्रतिक्रिया महेश साठे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages