माझ्या मुलांना आयुष्यातून उठविण्याचा घाट ज्यांनी घातला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का - उद्धव ठाकरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 8, 2022

माझ्या मुलांना आयुष्यातून उठविण्याचा घाट ज्यांनी घातला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का - उद्धव ठाकरे

माझ्या मुलांना आयुष्यातून उठविण्याचा घाट ज्यांनी घातला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का - उद्धव ठाकरे

               मुंबई, (नासिकेत पानसरे):- माझ्या मुलांना ज्यांनी आयुष्यातून उठवण्याचा घाट घातला तसे ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात, असा सवाल माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केला आहे. मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. 

               आदित्य ठाकरेंवर भाजप कडून सातत्याने करण्यात आलेल्या गेल्या अडीच वर्षांतल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.तर यावेळी समोरासमोर येऊन बोलण्याचं आवाहनही त्यांनी बंडखोरांना केलं. बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं की,मातोश्रीवर सन्मानानो बोलावलं, येऊ तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत आम्हाला आदर आहे,या भूमिकेवर सवाल उपस्थित केल.उद्धव ठाकरे म्हणाले की, मातोश्रीवर सन्मानाने बोलावलं, असे बोलणाऱ्यांना मातोश्री, आदित्य, उद्धव यांच्याबाबत प्रेम आहे, याबद्दल धन्यवाद, पण हे जे प्रेम दाखवता, तेच प्रेम दोन अडीच वर्ष कुठे होतं, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. मातोश्रीवर जेव्हा अश्लाघ्य टीका केली जात होती, तेव्हा त्यांच्या विरोधात दातखिळ बसली होती का? विकृत शब्दांत ज्यांनी आमच्यावर टीका केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. हे प्रेम खरं आहे की खोटं आहे. हेही जनतेला कळू द्या, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना चांगलच डिवचलंय. माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली.

               केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणेंनी केलेले सनसनाटी आरोप तेव्हा प्रचंड चर्चेत आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंवर करण्यात आलेल्या आरोपांवर बंडखोर आमदारांपैकी कुणी बोललं होतं का, असा सवालच अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलाय. दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणावरुनही आदित्य ठाकरेंवर नारायण राणेंनी टीका केली होती. हा वाद प्रचंड चर्चेत आला होता.

               दरम्यान, यावेळी शिवसेना ही आपलीच असल्याचा पुनरुच्चार करीत उद्धव ठाकरे म्हणाले की, साध्या साध्या माणसांना शिवसेनेनं मोठं केलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसंच अडीच वर्षांपूर्वी हे सगळं झालं असतं, तर ते सन्मानाने झालं असतं, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages