हिंमत असेल तर महापौर जनतेतून निवडून आणा - वसंत मोरे

मुंबई, (कटुसत्य वृत्त): ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपले हे मत मांडले आहे. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले होते. मागील निवडणुकीत ही संख्या दोनवर आली होती. पुण्यात मनसेची लोकप्रियताच वाढत असून थेट महापौर निवडण्यात आला तर मनसेचाच महापौर होईल, असे भाकित त्यांनी वर्तवले आहे.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता. आता महापौरांची निवडही तशीच करून दाखवा.”, असे आव्हान मनसेचे नेते वसंत मोरे यांनी दिले आहे.
“हिंमत असेल, तर महापौर जनतेतून निवडून आणा, मनसेचाच महापौर होईल.”, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात नवे सरकार आल्यानंतर प्रभाग रचना बदलण्याचे संकेत मिळत असून त्याचवेळी महापौरही जनतेतून निवडण्याचा निर्णय घेऊन पारदर्शकता दाखवावी, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment