शिवामृत दुध ऊत्पादक सहकारी संघाची निवङणुक प्रक्रीया सुरु

नवीन 14 तरुणांना संधी तर 12 नामनिर्देशन पञ दाखल
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाची निवङणुक प्रक्रीया सुरु झाली असून आज १२ नामनिर्देशन पञ दाखल करण्यात आले आहेत. या निवङणुकीत नव्या १४ तरुण चेह-यांना संधी देण्यात आल्याची माहीती धैर्यशील मोहीते पाटील यांनी दिली.
सन १९७६ साली स्थापना झालेल्या शिवामृत दुध संघाची ही १५ वी पंचवार्षिक निवङणुक आहे. या संस्थेच्या ११२ सभासद संस्था असून निवङणुक प्रक्रीयेद्वारे २१ संचालकांची निवङ करण्यात येणार आहे.
आर. जी. पाटील (प्रतिनिधी निवङणुक निर्णय अधिकारी) यांनी आज इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले. त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार दि. ८ जुलै ते १४ जुलै अर्ज दाखल करणे. १५ जुलै रोजी छाननी, १८ जुलै ते १ आॕगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेणे व १४ आॕगस्ट रोजी मतदान आणी निकाल अशी निवङणुक प्रक्रीया आहे. सदर २१ संचालकांमध्ये १६ सर्वसाधारण, २ राखिव महीला, १ ओबीसी, १ अनुसुचित जाती, १ इतर मागास प्रवर्ग व १ भटक्या जाती यांकरीता निवङणुक होणार आहे.
आज भास्कर लक्ष्मण तुपे (मेङद), ञिंबक ज्ञानदेव इंगळे (विजयवाङी), शरद बापू साळुंखे (मांङवे), आरुण भगवान थिटे (उंबरे वेळापुर), जगन्नाथ यशवंत जाधव (जाधववाङी), बाळासाहेबा सिताराम देशमुख (दृशमुखवाङी), सुभाष मारुती शिंदे (लोणंद), पोपट पांङुरंग बर्वे (कन्हेर), बाळासाहेब रावसाहेब पराङे (बाभुळगाव), अरविंद आण्णा भोसले (मांङवे), संजय कोंङीबा गोरे (फोंङशिरस), माधुरी रणजित फङतरे (येळीव) यांनी नामनिर्देशन पञं दाखल केली आहेत.
जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना आपल्या नव्या कल्पना संस्थेच्या उत्कर्षासाठी राबवता याव्यात. त्यामुळे जेष्ठ नेते विजयदादा, आ. रणजितसिंह मोहीते पाटील यांच्या विचाराने तरुणांना संधी देत असल्याची माहीती धैर्यशील मोहीते पाटील यांनी दीली. सातत्याने प्रगतीपथावर असलेल्या शिवामृत संस्थेची अनेक नामांकित उत्पादने आज महाराष्ट्रभर ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.
No comments:
Post a Comment