पोलीस अधिकाऱ्याचा पुढाकार,युवकांच्या मदतीने भाविकांचा मार्ग सुखद ; प्रवाशांनी पाहिला वर्दीतला माणूस

लऊळ (कटुसत्य वृत्त):-खाकी वर्दीतला कायदेशीर पद्धतीने सराईत गुन्हेगारांना सरळ करणारा, समाजाचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणारा व सामाजिक सलोखा ठेवणारा पोलीस अधिकारी सर्वांनी पाहिलेला असेल.परंतु आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांनी वर्दीतला माणूस दिसून आला.सविस्तर माहितीनुसार कुर्डुवाडी पंढरपूर रस्त्यावर लऊळ गावानजीक गेल्या दोन वर्षांपासून पुलाचे काम अर्धवस्थेत आहे. पुलानजीकच्या असलेला कच्चा रस्ता व त्यावरील मोठमोठाले खड्डे याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता.परंतु नागरिकांना होणारा त्रास कुर्डुवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांच्या पुढाकाराने आता कमी झाला आहे.गावातील तरुणांसोबत बोधे यांनी जेसीबीच्या साहाय्याने संबंधित रस्त्यावरील खड्डे बुजवत स्वतः श्रमदान केले.दरवेळी अधिकाऱ्याचा खुर्चीत बसलेले बोधे रस्त्यावर उतरून काम करताना पहायला मिळाले.
याप्रसंगी बंडू चांदणे,समाधान चांदणे,अमोल गवळी,सुधाकर चांदणे यांनी सदर कामासाठी सहकार्य केले.बोधे यांनी तरुणांना सोबत घेऊन केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविल्याने वाहनांना होणारा अडथळा दूर झाला आहे.भाविकांचा मार्ग सोईस्कर झाला आहे. - जयदेव पठारे (भाविक अंबाजोगाई)
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी माणसे मिळतील का?असा फोन आला कामाच्या ठिकाणी गेलो स्वतः बोधे साहेबांना काम करताना पाहून काम करण्यास उत्साहीत झालो व मदत केली. - बंडू चांदणे (मदतकर्ता तरुण,लऊळ ता.माढा)
No comments:
Post a Comment