जि.प.शाळा मसोबावाडी येथील विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील जि.प.शाळा मसोबावाडी जि.प.शाळा उपळाई बु येथील सर्व विद्यार्थ्यांना रविराज कलशेट्टी (IRS बेल्लारी ) यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचे वाटप उपळाई बु येथील सोमेश्वर रामेश्वर शेंडे यांनी केले.वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देऊन ते दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत असतात.त्यांचा हा उपक्रम समाजाला नवी दिशा ठरणार आहे. यावेळी रविराज कलशेट्टी मिञमंडळाचे सोमेश्वर रामेश्वर शेंडे मसोबावाडी येथील शिक्षक रणजित जाधव सुर्यकांत उबाळे, जि.प.शाळा उपळाई बु येथील शिक्षक किरण डाके ,दिनेश गुंड तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इसाक काझी विशालाक्षी ,सत्यम,नंदिकेश्वर, विश्वेश्वर, शुभम, शिवश्री, स्वप्निल झाडबुके इसाक काझी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment