धाडस सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 12, 2022

धाडस सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न

धाडस सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न 

               घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):- धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील व सोलापुर जिल्ह्यातील  नूतन  पदाधिकारींच्या निवडी संपन्न झाल्या.

             धाराशिव  (उस्मानाबाद) जिल्हा अध्यक्ष पदी नितिन राजेंद्र जगदे, सिंधटेक जिल्हा परिषद विभाग प्रमुखपदी पुत्राप्पा शावरसिद्ध देसाई, सोलापुर जिल्ह्यातील माढा-करमाळा तालुका संपर्क प्रमुखपदी  बाळासाहेब शांतिलाल कोळी, माढा तालुका  अध्यक्षपदी परशुराम माणिक कांबळे,माढा तालुका उपाअध्यक्षपदी कुणुद नवनाथ कोळी, करमाळा तालुका अध्यक्षपदी अक्षय शिंदे, दक्षिण सोलापुर युवक तालुका अध्यक्षपदी प्रशांत मात्रे, करमाळा तालुका कार्याध्यक्षपदी सागर शिंदे यांच्या निवडी धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा  कोळी यांच्या निवासस्थानी  (मुख्य धाडस कार्यालय) मध्ये अर्धनारी येथिल मेन आफिस येथे पार पडल्या.

             यावेळी नविन पदाधिकार्यांना शरद कोळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देन्यात आले त्यावेळी शरद दादा कोळी यांनी मार्गदर्शन केले आपली धाडस समाजिक संघटना ही 3 ते 4 राज्यात पसरलेली सामाजिक संघटना असुन ही दिन_ दलित, गोरगरीब 18 पगड बारा बलुतेदार बहुजनासाठी जात पात न बघता जनतेसाठी काम करनारी संघटना असुन सर्वांणी एक जुटीने काम करून संघटनेच नाव लौकिक करावे.

             वांरवार गोरगरीबांच्या कामासाठी अधिकारी वर्ग त्रास देत असेल, किरकोळ बाबींसाठी गरिबांचे कामे रखडवली जातात गरिबांच्या कामाला अधिकाऱ्याकडून वेळेत न्याय मिळत नाही म्हणून धाडस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारून गरजू गरीब जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरनाविरुद्ध त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी न्याय मिळवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला पाहिजे गोरगरिबांना न्याय मिळवण्यासाठी वेळप्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वतःचं रक्त द्यायची वेळ आली तरी देखील दिलं पाहिजे परंतु अर्ध्यात काम सोडून कार्यकर्त्यांनी पळून जाता कामा नये  एकत नसेल तर  शेवटी धाडस स्टाईलनेच अधिकाऱ्याला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल 24 तास केव्हाही जनतेच्या सेवेसठी उपलब्ध आहे, सर्वांनी स्वताच्या मनामध्ये एक वेगळ  ”धाडस ” निर्माण करून धाडस संघटनेचे ध्येय धोरण विचार शहरात ग्रामीण भागामध्ये घराघरापर्यंत पोचवून धाडस संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे व जनतेची कामे करावीत,  असे शरद दादा कोळी यांनी सांगितले यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले,

             निवड़ीच्या कार्यक्रमास प्रकाश गुंड –पाटील,भारत जाधव,विनायक भोसले, पांडुरंग कोळी, उमेश भोई, हनमंत भोई, धनाजी पाटील, व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages