सत्ता परिवर्तनासाठी शिक्षक समिती निवडणूक लढविणार - अनिल कादे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 12, 2022

सत्ता परिवर्तनासाठी शिक्षक समिती निवडणूक लढविणार - अनिल कादे

सत्ता परिवर्तनासाठी शिक्षक समिती निवडणूक लढविणार - अनिल कादे

               माढा (कटूसत्य वृत्त ) शिक्षक समिती हे लढवय्या कार्यकर्त्यांचे संघटन असून शिक्षक हितासाठी  केलेल्या कामाच्या बळावर आगामी जिल्हा शिक्षक पतसंस्थेची निवडणूक शिक्षक समिती ताकदीने लढविणार असून समविचारी मित्र संघटनांना सोबत घेऊन भक्कम पर्याय देणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी दिली .

               महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेतील विविध तालुका शाखांतील प्रमुख पदाधिकार्यांची सहविचार बैठक मोहोळ येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अनुषंगाने राजकीय व्यूहरचना निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी मागील चार दिवसांत विविध संघटनांसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलवार आढावा सादर करण्यात आला. मात्र सन्मानजक पद्धतीचा प्रस्ताव समोर न आल्याने तडजोडीच्या राजकारणात अडकून न पडता शिक्षक समितीच्या पुढाकाराने येतील त्यांना सोबत घेऊन सत्ता परिवर्तनासाठी भक्कम पर्याय उभा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

               यावेळी सर्व तालुका शाखांतील पदाधिकार्यांनी अंतिम  मतदार यादीतील मतदार संख्या विचारात घेऊन स्वबळाची ताकद व मित्र संघटनांची जोड देऊन तयार होणारी गोळाबेरीज याचा शाखावार आढावा सादर केला. जिल्ह्यातील शिक्षक बांधव जिल्हा शिक्षक पतसंस्थेमध्ये सत्ताबदल करण्यासाठी उत्सुक असून भक्कम पर्याय देण्याची जबाबदारी शिक्षक समितीची असून समविचारी मित्र संघटनांना सोबत घेऊन सत्तापरिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

               या बैठकीला राज्य नेते राजेंद्र नवले जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन   विकास उकीरडे भारत कुलकर्णी दयानंद कवडे यांच्या सह शिक्षक नेते सुरेश पवार  राजशेखर उंबराणीकर सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी  माजी जिल्हाध्यक्ष राजन सावंत गिरमल बिराजदार बाबू मठपती दत्तात्रय पोतदार कन्नड जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव  प्रताप काळे ,कार्याध्यक्ष चंद्रहास चोरमले,कोषाध्यक्ष रमेश खारे यांनी मार्गदर्शन केले .

               यावेळी तालुकाध्यक्ष  अदिनाथ देवकते  शंकर अजगोंडे सुनिल कोरे कैलास काशीद विठ्ठलराव ताटे शरद रुपनवर अन्वर मकानदार   भारत लवटे रामराजे ताकभाते  बाबासो माने धर्मराज चवरे  प्रमुख उपस्थित होते .

               यावेळी बिरमल खांडेकर शिवानंद बिराजदार  गोरख राऊत तानाजी ढवळे  पोपट कापसे हेमंत माने मधुकर डोंगरे हणमंत पिसाळ शेखलाल शेख,राजन ढवण ईस्माईल मुर्डी राजेंद्र माने, प्रशांत ओव्हाळ धर्मराज रमणशेट्टी अशोकराव पाटील शरद गावडे एकनाथ कुंभार शरद गावडे विजय गोडसे राजेंद्र बारबोले उमेश कानडे गणेश कोरपे अभिजित गायकवाड अंकुश वाघमोडे 

               विश्वास आवताडे  मो.बा.शेख, ईश्वर वाघमोडे  रमेश साठे, प्रदीप चवरे  जब्बार मुलाणी गोकुळ सुरवसे विजय मुकणे, विनोद परिचारक यांच्यासह शिक्षक समितीचे विविध तालुक्यातील जवळपास २००हून अधिक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages