स्वच्छता, आरोग्याची जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 12, 2022

स्वच्छता, आरोग्याची जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून पाहणी

स्वच्छता, आरोग्याची जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून पाहणी



500 टन कचऱ्याची विल्हेवाट : नदीत बुडणाऱ्या 134 भाविकांचे वाचविले प्राण 

             पंढरपूर, (कटुसत्य वृत्त):- आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या  वारकरी व कोणतेही गैरसोय होऊ नये  यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी नदीपात्र, मंदीर भेट देवून  स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा तसेच प्रशासनाकडून  देण्यात आलेल्या आदी  सोयी सुविधांची पाहणी यांनी केली.

            यावेळी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर,  प्रशांत बेडसे, राजेश चव्हाण, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली तसेच  आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली व आरोग्य केंद्रात आतापर्यंत किती भाविकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतली .

यात्रा कालावधीत नगर पालिकेकडून येणाऱ्या भाविकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आले असून पंढरपूर शहरात दैनंदिन 40 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत असून आठ दिवसात 320 एमएलडी शुद्ध पाणीपुरवठा केला आहे तसेच शहरातून आत्तापर्यंत 500  टन कचरा उचलण्यात आला असून वेळोवेळी स्वच्छता व फवारणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

दिनांक 01  ते 10 जुलै 2022 या कालावधीमध्ये सुमारे 3 लाख 64 हजार 680 भाविकांनी श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेतले आहे, आषाढी एकादशी दिवशी सुमारे 44 हजार 880  एवढ्या भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले आहेत श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचे सुमारे 3 लाख 76 हजार 324 भाविकांनी मुख दर्शन घेतले असून, भाविकांना दर्शन रांगेत तसेच दर्शन मंडपात मंदीर समिती मार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

            आपत्ती व्यवस्थापन सोलापूर ,वजीर रेस्क्यू पथक मुळशी, मानव सेवा सामाजिक विकास संस्था अकोला व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मुळशी या चार पथकांनी चंद्रभागा नदीपात्रामध्ये 24 तास बोटीने गस्त घालत आंघोळीसाठी गेलेल्या परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीत बुडणाऱ्या 134 भाविकांचे प्राण वाचविल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages