टेंभुर्णी येथे संजय मामा शिंदे यांच्या हस्ते वारकर्यांना मोफत फराळाचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 11, 2022

टेंभुर्णी येथे संजय मामा शिंदे यांच्या हस्ते वारकर्यांना मोफत फराळाचे वाटप

टेंभुर्णी येथे संजय मामा शिंदे यांच्या हस्ते वारकर्यांना मोफत फराळाचे वाटप

माजी उपसभापती तुकाराम ऊर्फ बंडू नाना ढवळे यांच्या संकल्पनेतून उपक्रम, हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ

              टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- जातो माघारी पंढरीनाथा,तुझे दर्शन झाले आता'असे म्हणत माघारी जाणार्‍या वारकरी मंडळी साठी टेंभुर्णी येथे  उपवास साठी खास साबुदाणा खिचडी व केळी वाटप केले याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.  माजी उपसभापती तुकाराम ऊर्फ बंडू नाना ढवळे यांच्या संकल्पनेतून उपक्रम घेतला  पाच हजार भक्तांना मोफत केळी व खिचडी वाटप करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघा चे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे,  सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा जि.प.सदस्य मा.श्री.रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 

              कार्यक्रमाचे वेळेस त्यांच्या समवेत टेंभुर्णी गावचे विद्यमान सरपंच प्रमोद कुटे ,जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, आयोजक श्री.बऺडुनाना ढवळे (जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी), माढा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.रमेश पाटील,  शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, तांबे गावचे तंटामुक्त अध्यक्ष नागाभाऊ खटके, तांबवे विकास सोसायटीचे मा. चेअरमन संतोष खटके, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले, जाणता राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधिर महाडिक, रमेश आबा देशमुख, माळेगावचे आप्पासाहेब पाटील, वरवडेचे नागनाथ दादा पाटील, आबा मालक ढवळे, नागनाथ आप्पा ढवळे, धनंजय ढवळे साहेब टेंभुर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष अनिल जगताप , पत्रकार सचिन होदाडे, आरपीआयचे  परमेश्वर खरात, सापडण्याचे माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, डॉ. अमोल काळे हनुमंत ढवळे ,सचिन तळेकर व वारकरी उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी कारणासाठी अनिल ढवळे, अमोल ढवळे  संतोष जगताप ,पिंटू गायकवाड ,माऊली ढवळे ,दादासाहेब गायकवाड हनुमंत थोरात, सुनील थोरात ,वसंत कुबेर, हिंदवी प्रतिष्ठान चे विजय दादा खटके,  शेतकी अधिकारी विजय खटके, गणेश व्यवहारे, सचिन पवार, हॉटेल वैष्णवी चे गणेश खटके हॉटेल शिवशंकर चे मालक  बाळासाहेब चव्हाण, यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मुळे यांनी केले तर आभार विजय खटके यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages