कुर्डूवाडीतील रेल्वे गेट वरील उड्डाणपूलासाठी प्रयत्नशील : रेल्वे राज्यमंत्री

रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे कुर्डूवाडीत भाजप व मित्रपक्षच्या वतीने स्वागत
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असताना कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भाजप मित्र पक्षच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष शंकर बागलप.रिपाई.(आ) गट महा.सचिव चंद्रकांत वाघमारे,रेल्वे कामगार नेते महेंद्र जगताप,सुधीर मरळ यांच्यासह रेल्वे शिष्टमंडळ यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी रेल्वे संबंधित विविध मागण्या करण्यात आल्या.रेल्वे गेट नंबर ३८ येथील उड्डाणपूल,इतर रेल्वे थांबा व सोलापूरला जाण्यासाठी प्रवाशी,कर्मचारी,व्यापारी यांची गैरसोय लक्षात घेता चेन्नई मेल एक्स्प्रेस पूर्वी प्रमाणे स.८ वा करण्यात यावी व रेल्वेच्या इतर प्रश्नासंदर्भात निवेदन ही देण्यात आले.याबरोबरच कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉप व चिंकहील ट्रेनिंग सेंटर येथे भेट द्यावी अशी विनंती करण्यात आली.यावेळी भडकवाड साहेब,सुधीर मराळ,रामभाऊ ताकभाते हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment