दामाजी स.साखर कारखान्याच्या चेअरमनपदी शिवानंद पाटील व व्हाईस चेअरमनपदी तानाजी खारात यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 26, 2022

दामाजी स.साखर कारखान्याच्या चेअरमनपदी शिवानंद पाटील व व्हाईस चेअरमनपदी तानाजी खारात यांची निवड

 दामाजी स.साखर कारखान्याच्या चेअरमनपदी शिवानंद पाटील व व्हाईस चेअरमनपदी तानाजी खारात यांची निवड 

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी शिवानंद पाटील यांची व व्हाईस  चेअरमनपदी तानाजी खारात यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली

आज श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची व व्हा. चेअरमन पदाची निवड जाहिर करण्यात आली, या निवडीसाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने ह्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या, निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून मंगळवेढा प्रांतधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी काम पाहिले. निवड जाहिर होताच कारखाना स्थळावर अनेक कार्यकर्त्यांनी फटाके वजवुन आनंद साजरा केला.


निवड जाहिर झाल्यानंतर नवीन चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन तानाजी खारात यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले, यात अजित जगताप, लतीफ तांबोळी, औदुबंर वाडदेकर,नंदकुमार पवार, प्रा.शिवाजी काळूंगे सर आदींनी‌ आपले मनोगत व्यक्त केले.

दामाजी स.साखर कारखाना निवडनुकित विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना हारवून समविचारी आघाड़ीचा विजय झाला होता. यामध्ये शिवानंद पाटील, तानाजी खरात, राजेंद्र पाटील, औदूंबर  वाडदेकर, भारत बेदरे, पी. बी. पाटील, गौरीशंकर बुरकुल, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, गोपाळ भगरे, महादेव लुगड़े, बसवराज पाटिल, भिवा दोलतोडे, मुरलीधर दत्तू, रेवनसिध्द लिगड़े, दयानंद सोनगे, तानाजी कांबळे,निर्मला काकडे,लता कोळेकर हे परिचारक–भालके समविचारी आघाड़ीतुन निवडुन आले आहेत.

यांच्यातुनच आज शिवानंद पाटील यांची चेअरमन व सर्वाधिक मताने निवडून आलेले तानाजी खरात यांची व्हा ईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी प्रा.शिवाजी काळूंगे,नंदकुमार पवार, अजित आप्पा जगताप, रामकृष्ण नागने, लतीफ तांबोळी, औदुंबर वाडदेकर, शशिकांत बुगड़े, भारत पाटिल, अर्जून पाटिल,दादा गरांडे, सुनिल डोके, यादप्पा माळी, संभाजी गावकरे, अरुण किल्लेदार, सुब्राव बेदारे,शिवाजी घोड़के, विठ्ठल आसबे, पंडित गवळी, अशोक माने व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते, आजारी असल्याने दामोदर देशमुख उपस्थित राहु शकले नाहीत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages