आमदार सुमनताईंच्या हस्ते स्वागत कमानीचे लोकार्पण

सांगोला (कटूसत्य वृत्त):- तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेच्या आमदार सुमनताई आर आर पाटील यांच्या हस्ते पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला येथील आक्काताई भिमराव बिले यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या नारळाचा मळा स्वागत कमानीचे लोकार्पण करण्यात आले.राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांनी निसर्गसौंदर्याने नटलेल्या पाचेगावात स्वागत कमानीमुळे गावच्या वैभवात भर पडल्याचे सांगितले.आमदार सुमनताईंनी सांगितले की आर आर आबांच्या निधनानंतर सगळे दु:ख विसरुन साहेबांनी कमवलेले नाव मागे पडेल.साथ दिलेल्या लोकांसाठी उभे राहिले पाहिजे म्हणुन उभी राहिली.सात वर्षे झाली.या आधी कधी ही घराबाहेर पडण्याचा प्रसंग आला नव्हता.घराबाहेर पडल्यानंतर महिलांना कुठे काय करायचे ते समजते.आबांनी कुणालाही दुखवले नसल्याने आम्हाला कुणीही दुखवले नाही.सर्वांनी साथ दिली.तासगाव कवठेमहांकाळ मध्ये कामे आणली.मुलगा रोहित आबांनी कमवलेले नाव बघत एेकत मोठा झाला.मुलगा रोहित व धाकट्या दिरांनी आबांनी कमवलेले नाव पुढे चालवले.धाकट्या दिरांनी रोहितला साथ दिली.यावेळी गावातील नेतेमंडळी,महिला,ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment