महुद बु"येथे आम बच्चू(भाऊ)कडु यांच्या वाढदिवसानिमित्तने प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 11, 2022

महुद बु"येथे आम बच्चू(भाऊ)कडु यांच्या वाढदिवसानिमित्तने प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

महुद बु"येथे आम बच्चू(भाऊ)कडु यांच्या वाढदिवसानिमित्तने प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

               सांगोला (कटुसत्य वृत्त): महुद बु  ता सांगोला येथे आम बच्चू (भाऊ) कडू  यांच्या वतीने प्रहार   दिव्यांग सघटनेचे तालुकाध्यक्ष  सतिश दिडवाघ यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

               आमदार बच्चु(भाऊ)कडु हे देशातील एकमेव नेते असे आहेत कि ज्यांनी स्वा:ता १०० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे. भाऊ प्रत्येक कामाची सुरुवात किंवा आंदोलन हे रक्तदान करूनच करतात.रुग्णसेवेत ते अग्रेसर असतात म्हणून त्यांचा वाढदिवस हा रक्तदान करून साजरा करण्यात आला असे प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष सतिश दिडवाघ यांनी सांगितले.

               यावेळी स्वाभिमानी संघटनेचे अर्जून लुबाळ, कामगार नेते राजाभाऊ मेटकरी, चंद्रकांत पवार,सागर ढाळे, गणेश ढाळे, प्रकाश शिरतोडे,सागर कदम, श्रीकांत ढाळे, समाधान दिडवाघ,समिर मुलाणी, संघर्ष लुबाळ, लिंगराज ढाळे, सचिन ढाळे, मोहन येळे, मोहन येडगे, राजस्त्री मस्के, रेखा पवार ‌व रेवनिल ब्लड बॅक सांगोला सर्व स्टाफ प्रहारचे कार्यकर्ते, रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages