हरी नामाच्या जयघोषात सांगोला विद्यालयाचा आषाढी वारी दिंडी सोहळा संपन्न

सांगोला (कटुसत्य वृत्त): हरी नामाचा जयघोष करीत सालाबाद प्रमाणे यावर्षी ही सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आषाढी दिंडी पालखी सोहळा सांगोला शहरातून मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला.
तत्पूर्वी या पालखी सोहळ्याची सुरुवात विठू माऊलीच्या आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या फोटो पूजनाने झाले. यावेळी इंग्लिश मेडिअम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे मॅडम, प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रोहिणी व्हटे यांच्या हस्ते पालखीचे पूजन पार पडले.
या दिंडीतून विद्यार्थ्यानी सामाजिक समतेचा संदेश दिला. सदर दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यानी विठ्ठल रखुमाई आणि विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. विद्यार्थ्यानी सांगोला शहरात ठिकठिकाणी भक्तीपर गीतावर नृत्य सादरीकरण करून नागरिकांची मने जिंकली. सदर नृत्यामधून वारकऱ्यांनी वारकरी संप्रदाय तसेच संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार इ. विविध संताचा माहितीपट साकारला.
या दिंडीसोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांच्या फलकांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देऊन जनजागृती केली.यानिमित्ताने सर्व विद्यार्थी विठ्ठल-रूक्मिणी, विविध संत तसेच वारकरी वेशभूषेमध्ये हजर होते. महादेव गल्ली येथे झपके कुटुंबियांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले.यावेळी संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सर,कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके उपस्थित होते. अतिशय मंगलमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव प्रमुख शुभांगी पवार, अनुपमा गुळमिरे तसेच दोन्ही माध्यमाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश्वर घोंगडे, जगन्नाथ साठे, शाशिल ढोले-पाटील यांनी केले,तर आभार संतोष बेहरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment