अनोळखी महिलेच्या खुनाचा लोणी काळभोर पोलीसांनी अवघ्या चार दिवसात लावला छडा

लोणी काळभोर (कटुसत्य वृत्त): थेऊर येथे चार दिवसापूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. वैशाली लाडप्पा दुधवाले, रा. भिमा कोरेगाव, ता. शिरुर, मुळगाव रा.
चिवरी, उमरगा, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद असे खून झालेल्या महिलेचे नाव असून अनैतिक संबंधाच्या संशयावरून तिच्याच प्रियकराने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महेश पंडित चौगुले (वय-२४, रा. तळेगाव दाभाडे, पुणे मुळ गाव रा. चिवरी, उमरगा, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला मा. न्यायालयात हजर केले असता त्यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी. न्यायलय क्र. ०७ शिवाजी नगर पुणे यांनी ६ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याच्या पुढील तपास सुभाष काळे पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) हे करित आहे .
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत एक अनोळखी अनोळखी महिलेचा तिच्या डोक्यात दगड घालुन खून करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डोक्यात दगड घालुन खुन केल्याचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
मृत अनोळखी महिलेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना तसेच तिची ओळख पटलेली नसल्याने तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते
पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकाला योग्य त्या सुचना देऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला असता सदर महिलेचा प्रियकर महेश चौगुले याला तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी करीत असताना सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदर महिलेचे नाव सांगितले. तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे त्याने सांगितले. तसेच चारित्र्याच्या संशयावरून तिचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली महेश चौगुले याने पोलिसांना दिली आहे.
चिंतामणी हायस्कुल समोरील मैदाना शेजारी, तसेच यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेतून संध्याकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास कोणी फोन केले या वरून पोलिसांनी सदर खुनाचा उलगडा केला आहे. त्यानुसार पोलिसांनी शेवटी झालेल्या मोबाईल नंबरवरून सदर आरोपीला तळेगाव दाभाडे परिसरातून अटक केली आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, आनंद पाटोळे,श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, गणेश भापकर, राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, मल्हारी ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment