रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी जपणार - डॉ परेश खंडागळे

सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोला येथील नामवंत डॉ परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद हॉस्पिटल सांगोला येथे 31रक्तदात्यानी रक्तदान शुभेच्छा दिल्या. सदर रक्तदान शिबिराप्रसंगी प्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉ अमर शेंडे, स्त्री रोग तज्ञ डॉ स्वाती खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू रुग्णांना फायदा व्हावा म्हणून 1 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. आज 9 जुलै डॉ परेश खंडागळे यांच्या व 16 ऑगस्ट डॉ अमर शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद हॉस्पिटल मध्ये महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये
अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करणार आहोत यामध्ये हॉस्पिटल,भूल, मेडिकल खर्च समाविष्ट आहे.
- सिझेरियन 15000 रू
- गर्भाशय पिशवी काढणे 15000रू
- हर्निया 15000रू
- अपेंडिक्स 15000रू
- मूळव्याध 15000रू
- हायड्रोसिल 15000रू
- फीच्युला 15000रू
- भगेंदर 15000रू
- सुंता 10000रू
- नॉर्मल डिलिव्हरी 5000रू
- गर्भाशय पिशवी साफ करणे 6000रू
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 7000रू
- सोनोग्राफी 500 रू
- तपासणी फी 100 रू
- (या मध्ये हॉस्पिटल, भूल, मेडिकल खर्च समाविष्ट आहे)
- रक्त तपासणी व रक्त लावणे याचा खर्च वेगळा राहील
- गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या मध्ये समाविष्ट नाहीत
- स्पेशल रूम चार्जेस वेगळे राहतील.
बाळाला ॲडमिट करण्याची गरज पडल्यास मोफत व अल्प दरामध्ये सोय अशा पद्धतीची सोय केली असून गरजूनी आनंद हॉस्पिटल,भोपळे रोड, सांगोला येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment