जवळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी मानसिंग साळुंखे पाटील तर व्हा. चेअरमनपदी दाजी यमगर बिनविरोध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 11, 2022

जवळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी मानसिंग साळुंखे पाटील तर व्हा. चेअरमनपदी दाजी यमगर बिनविरोध

जवळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी मानसिंग साळुंखे पाटील तर व्हा. चेअरमनपदी दाजी यमगर बिनविरोध

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सक्रिय असणाऱ्या संस्थेची बिनविरोधची परंपरा ७६ व्या वर्षीही कायम...! 

             सांगोला (कटुसत्य वृत्त): संपूर्ण राज्यातील पहिल्या ३ क्रमांकाच्या सोसायटीमधे समाविष्ट जिल्ह्यातील एकमेव नामवंत संस्था आणि स्वातंत्र्यपूर्व काळात १९४६ रोजी स्थापन झालेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म्हणून नावलौकिक असलेल्या जवळा विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंग साळुंखे पाटील तर व्हा. चेअरमनपदी शेतकरी कामगार पक्षाचे दाजी यमगर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा ७६ व्या वर्षीही कायम ठेवण्यात आली. स्व. आम. काकासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून शनिवार दि ९ जुलै रोजी या निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन, माजी चेअरमन, नूतन संचालक, माजी संचालक, सभासद, सचिव व मान्यवर उपस्थित होते.

             चेअरमन व व्हा चेअरमन निवडीपूर्वी जवळा वि. का. सेवा सह. सोसायटीची संचालक मंडळाची निवडही बिनविरोध पार पडली होती. संस्थेचे मार्गदर्शक मा. आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या निवडणुकीची बिनविरोध परंपरा ७६ वर्षानंतरही कायम ठेवलेली आहे. या सोसायटीचे कार्यक्षेत्र जवळा, आगलावेवाडी, भोपसेवाडी, बुरंगेवाडी व तरंगेवाडी असे आहे. पाच गावांत कार्यक्षेत्र असणारी राज्यातील एकमेव व राज्यामध्ये नावाजलेली संस्था जवळा विकास सेवा सोसायटीची ओळख आहे. या संस्थेचे माजी चेअरमन स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकपद भूषविले होते. पूर्वी संस्थेकडे शेती अवजारे व बैल जोडी नाममात्र भाड्याने दिली जात असत. तसेच संस्थेची एकंदर आर्थिक परिस्थितीही संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात इतर संस्थांच्या तुलनेत उल्लेखनीय आहे. संस्थेस मार्च २०२२ अखेर ६ लाख रुपये नफा झाला असून संस्थेचे भाग भांडवल १ कोटी रुपये आहे. सभासद कर्ज ३ कोटी ७० लाख असून बँक कर्ज २ कोटी ९० लाख इतके आहे. यापैकी १००% बँक भरणा केलेला आहे. बँकेमध्ये संस्थेची रुपये ५५ लाख मुदत ठेव सोने तारण कर्ज ५१ लाख बचत ठेव ३० लाख एवढी आहे. संस्था सतत पाच वर्षे अ वर्गात असून गतवर्षी संस्थेने 12% लाभांश सभासदांच्या बँक सेविंग खात्यावर जमा केला होता. यावर्षीही लाभांश सभासदांना देण्यात येणार आहे. संस्थेमध्ये कोणतेही पक्षीय राजकारण व जातीभेद केला जात नाही. सर्वधर्मसमभाव तत्वावर संस्थेचे काम चालते. संस्थेत सर्व गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाते संस्थेच्या प्रगतीमध्ये माजी चेअरमन श्री विजयकुमार देशमुख व्हा. चेअरमन श्री राजेंद्र गावडे व माजी संचालक मंडळ सभासद वर्ग सचिव हेमंत कुलकर्णी व कर्मचारी या सर्वांचा सहभाग आहे. तसेच कार्यक्षेत्रातील खातेदारांनी सभासद होऊन बिनव्याजी पीक कर्जाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.

             यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते नूतन चेअरमन मानसिंग साळुंखे पाटील तर स चेअरमन दाजी यमगर यांच्यासह सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. सलग 76 वर्षे सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक व चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवड बिनविरोध करण्यात अरुणभाऊ घुले, शिवाजीकाका बंडगर, बाबासो इमडे, दत्तात्रय बर्वे, शिवाजी गावडे, महेश बंडगर, मायाप्पा यमगर, अंकुश बुरंगे, संभाजी बुरंगे, ईश्वर मळगे, राजेंद्र गावडे, राजाराम कोळेकर, अर्जुन बुरंगे, आनंदराव यमगर आदींसह सर्व आजी माजी संचालक, चेअरमन व व्हा. चेअरमन तसेच सभासद बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. यापुढील काळातही संस्थेची दैदिप्यमान परंपरा कायम जपावी असे आवाहन नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालकांना मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages