जिव्हाळा वृद्धधश्रमाच्या सुनीता कोलते यांचा स्वामी समर्थ भूषण पुरस्काराने सन्मान

जेजुरी (कटुसत्य वृत्त): गुरुपौर्णिमा या सणाचे औचित्य साधून स्वामी समर्थ मठ साकुर्डे तर्फे देण्यात येणारा स्वामी समर्थ भूषण पुरस्कार सुंदर इच्छा शक्ती फौंडेशन,संचालित जिव्हाळा वृद्धाश्रम सासवड च्या संस्थापक अध्यक्षा सौ.सुनीता कोलते मॅडम यांना देण्यात आला.सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सुनीता कोलते ह्या 2014 पासून स्वतंत्र सेनानी प्रेमाताई कंठक, तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष शंकरराव देव यांच्या वास्तव्याने पावन झालेला सासवड आश्रम भाडेतत्त्वावर घेऊन जिव्हाळा वृद्धाश्रम हा गेली आठ वर्ष सेवाभावी वृत्तीने चालवीत आहेत
स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, चित्रकार, शिल्पकार श्री.दिनकर थोपटे या हस्ते सन्मानचिन्ह, स्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे साक्षात स्वामी समर्थांचा आशीर्वादच गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी मिळाला असे सुनिता कोलते म्हणाल्या.
यावेळी जिव्हाळा आश्रमाचे दत्तात्रय कोलते, विशाल कोलते, अभिषेक पवार,ताराबाई गायकवाड तसेच स्वामी समर्थ मठाचे ऍड.सुनिता नितीन सस्ते श्री नंदकुमार आगलावे,व
श्री काशिनाथ आगलावे (खंडोबा देवस्थान मुख्य पुजारी)श्री हरिभाऊ लोणकर (भविष्य विशारद) उद्योगपती संतोष पवार चित्रकार बिभीषण झांजे प्रसिद्ध मूर्तिकार दिपक दिनकर थोपटे,सौ सुरेखा दीपक थोपटे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment