खरिप हंगाम 2022-23 मध्ये राज्यात विविध पिकांच्या पिक स्पर्धांचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 15, 2022

खरिप हंगाम 2022-23 मध्ये राज्यात विविध पिकांच्या पिक स्पर्धांचे आयोजन

खरिप हंगाम 2022-23 मध्ये राज्यात विविध पिकांच्या पिक स्पर्धांचे आयोजन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

पिकस्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतक-यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार

             सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- शेतक-यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर पिकस्पर्धाचे आयोजन करण्यासाठी कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन, नाचणी (रागी), भात, ज्वारी, ज्वारी, भुईमुग, सुर्यफूल या ११ पिकांचा खरीप हंगाम पीक स्पर्धा २०२२ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

             पिकस्पर्धेसाठी तालुका घटक निश्चित केला असून ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र १००० हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांकरीता पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतक-यांकडे संबंधित पिकाखालील किमान १० आर. (०.१० हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतक-यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे.

             पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक व आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी रू.३०० प्रति शेतकरी प्रति पिक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे राज्य विभाग व जिल्हास्तरावर बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे.

             आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असून त्यासाठी एकदाच रू.३०० प्रति शेतकरी प्रति पिक प्रवेश शुल्क भरून पिककापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका,

             याशिवाय पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे.

  1. तालुका पातळी –पहिले बक्षिस 5 हजार- दुसरे 3 हजार- तिसरे 2 हजार ,
  2. जिल्हा पातळी- पहिले 10 हजार – दुसरे 7 हजार – तिसरे 5 हजार,
  3. विभाग पातळी – पहिले 25 हजार-  दुसरे 20 हजार – तिसरे 15 हजार
  4. राज्य पातळी- पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार ,तिसरे 30 हजार

             खरिप हंगाम सन 2022-23 मध्ये पीक स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 उडीद व मुग पिके तर उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट 2022 आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages