पंढरपुरात नदीपलिकडे चंद्रभागा रेल्वे स्टेशन सुरू करा

पंतप्रधान मोदी यांच्याकडे अ.भा.पद्मशाली पुरोहित संघम ज्ञानपिठम यांची मागणी
पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्विकारल्यापासून भारतातील अमरनाथ, केदारनाथ, राम मंदिर अशा हिंदूंच्या पवित्र स्थानांचा विकास केलेला आहे. त्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपलिकडे रेल्वेच्या मालकीच्या 35 एकर जमिनीवर नदीपलिकडील 65 एकरात 1 वर्षात सुमारे 1 हजार दिंड्या येतात व सुमारे शेगाव दुमाला, भटुंबरे, गुरसाळे, आढीव, चिंचोली भोसे,पखालपूर, देगाव, विठ्ठलवाडी, इस्कॉन, गीता मंदिर अशा चंद्रभागा नदीच्या पलिकडे 10 किलोमीटर अंतरावर अनेक मठ झाले आहेत. त्या मठात रात्री अपरात्री सध्या असलेल्या रेल्वे स्टेशनवरून भाविकांना जाताना फार त्रास होतो व रिक्षाला जादा पैसे द्यावे लागतात. या त्रासापासून कायमचे मुक्त होण्यासाठी रेल्वेच्या वरील मालकीच्या जागेत चंद्रभागा रेल्वे स्टेशन नवीन निर्माण करावे.अशी मागणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे अ.भा.पद्मशाली पुरोहित संघम ज्ञानपिठम चे पंडीत वेणुगोपाल श्री.जिल्ला यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
याबाबत देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे काण्व शाखा प्रमुख दत्तात्रय बडवे तसेच पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व नवाकाळचे पत्रकार सत्यविजय मोहोळकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्यास आमचा पाठींबा असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिध्दीसाठी दिलेले आहे. सदरहू मागणी मान्य केल्यास नदीपलिकडील नागरिक, भाविकांची चांगली सोय होणार आहे. असे निवेदनात म्हटलेले आहे.
No comments:
Post a Comment