जिल्ह्यात अडीच ते तीन लाख मिळतदार फक्त २१०२ जणांनीच ग्रीन बिलासाठी नोंदणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

जिल्ह्यात अडीच ते तीन लाख मिळतदार फक्त २१०२ जणांनीच ग्रीन बिलासाठी नोंदणी

जिल्ह्यात अडीच ते तीन लाख मिळतदार फक्त २१०२ जणांनीच ग्रीन बिलासाठी नोंदणी

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन लाख मिळतदार आहेत. यापैकी फक्त २१०२ जणांनीच ग्रीन बिलासाठी नोंदणी केली आहे. या ग्रीन बिल नोंदणीसाठी ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.शहरातील ज्या मिळकतदारांना बिलाची हार्ड कॉपी नको असेल त्यांना सॉफ्ट कॉपी देण्यात येते. याला ग्रीन बिल असे म्हणतात. ग्रीन बिल घेणाऱ्या मिळकतदारांना सवलत देण्यात येते.या पद्धतीचे बिल ज्यांना हवे असेल त्यांनी ५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले होते. यासाठी आत्तापर्यंत २१०२ अर्ज आले आहेत. ज्या मिळकतदारांनी ग्रीन बिलासाठी अर्ज केला नाही, अशा मिळकतदारांना मंगळवारी (दि. ७) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.काही शहरात असलेल्या मिळतकदारांना ग्रीन बिलासाठी ऑनलाइन प्रोसेस करता येत नाही.

             त्यांच्यासाठी ऑफलाइन अर्ज सादर करण्याची सोय महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages