घंटागाडीकडून ट्रान्स्पोर्टेशन केंद्राकडे येणारा कचरा वर्गीकरण न करता घेतला जात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

घंटागाडीकडून ट्रान्स्पोर्टेशन केंद्राकडे येणारा कचरा वर्गीकरण न करता घेतला जात

घंटागाडीकडून ट्रान्स्पोर्टेशन केंद्राकडे येणारा कचरा वर्गीकरण न करता घेतला जात

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- घंटागाडीकडून ट्रान्स्पोर्टेशन केंद्राकडे येणारा कचरा वर्गीकरण न करता घेतला जात आहे. ओला व सुका कचरा जरी वेगळा करून आणला असला तरी ट्रान्स्पोर्टेशन केंद्रातील (आरसी गाडीमध्ये) एकत्रित करून टाकला जात आहे. हा प्रकार थांबण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. वर्गीकरण न करता कचरा टाकत असल्यास संबंधित मक्तेदारांना दंड करण्यात येणार आहे,अशी माहिती महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.शहरात चार कचरा ट्रान्स्पोर्टेशन केंद्र असून, या केंद्रात येणाऱ्या गाड्यांच्या नोंदी घेण्यात येते. या नोंदी व्यवस्थित होतात का, याची पाहणी महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे.ट्रान्स्पोर्टेशनमध्ये येणारा कचरा हा प्लास्टिक, ओला सुका कचरा वर्गीकरण करण्याच्या सूचना मक्तेदार यांनी दिल्या आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages