खते, बियाणेबाबत तक्रारीसाठी कृषी विभागांशी संपर्क करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 2, 2022

खते, बियाणेबाबत तक्रारीसाठी कृषी विभागांशी संपर्क करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांचे आवाहन

खते, बियाणेबाबत तक्रारीसाठी कृषी विभागांशी संपर्क करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांचे आवाहन

               सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- खरीप हंगाम 2022 च्या अनुषंगाने खते व बियाणे निविष्ठा उपलब्धता, खरेदी व दराबाबत काही अडचणी उद्भवल्यास जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील निविष्ठा विक्रेते व शेतकरी बांधवानी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 8446532173 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

               कृषी कार्यालयाला खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी येत असून त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी, दूरध्वनी, इमेल व समक्ष पत्राद्वारे प्राप्त होत आहेत. कामाची व्याप्ती पाहता सर्व तक्रारीचे निवारण करण्यास विलंब होत आहे, असे निदर्शनास आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages