प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 2, 2022

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत

               सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन पीएम किसान योजनेच्या नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.

               तालुका नोडल अधिकारी तथा तहसीलदार यांनी कृषि विभाग व ग्रामविकास यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यामध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवावी. पी.एम किसान पोर्टलवरील नोंदणीकृत सर्व पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया 31 जुलै 2022 पर्यंत पूर्ण करावी. विहित मुदतीत ओटीपी बेस्‌ड किंवा बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे या पोर्टलवरील पर्यायामार्फत तत्काळ पूर्ण करण्याचे आवश्यक नियोजन करावे. योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्रीमती पवार यांनी केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages