प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने रुग्णांना केळी सफरचंदाच वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने रुग्णांना केळी सफरचंदाच वाटप

प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने रुग्णांना केळी सफरचंदाच वाटप

प्रभाकर देशमुख यांचा मोहोळ मध्ये मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा

              घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ येथे शिवाजी महाराज चौकात आदर्श हॉटेल जवळ महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचा वाढदिवसा साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाकर देशमुख यांचा सत्कार जनहितचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मोरे अमोल पाटील चंद्रकांत निकम प्रशांत पाटील महेश बिस्किटे शिवाजी जाधव गोपीनाथ वराडे विनायक भोसले यांनी हार फेटा व शाल देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या यावेळी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना केळी व सफरचंदाचे वाटप करण्यात आलं यावेळी प्रभाकर देशमुख यांनी संकल्प केला होता की हार फेटयांना खर्च करण्यापेक्षा गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मला भेट द्या त्या पद्धतीने 32 डझन वह्या प्रभाकर देशमुख यांचा सत्कार करून देण्यात आल्या यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रभाकर देशमुख म्हणाले माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून महा विकास आघाडीने सत्तेवर आल्यानंतर जी रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 बक्षीस सन्मान योजनेतून जाहीर केलेले आहे त्याचा एकदमडाही   रुपया आज तागायत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा नाही ते पैसे खात्यावर जमा करायला शासनाला भाग पाडण्यासाठी तसेच थकीत ऊस बिलाच्या रकमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी उग्र स्वरूपाचे आंदोलन करून माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून मी शेतकऱ्यांना देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले पुढे बोलताना देशमुख म्हणाले शाळा सुरू झाल्यानंतर पाच हजार वह्यांचे गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने वाटप करणार असल्याचे ते म्हणाले वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाकर देशमुख यांचा करकम रोपळे पंढरपूर मंगळवेढा आणि विविध पदाधिकारी विविध पक्षाच्या नेत्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तळसंगी येथे उद्योगपती आदरणीय हनुमंत शेठ दुधाळ व प्रभाकर भैय्या देशमुख यांचा मंगळवेढा तालुक्यातील ज्येष्ठ नेते बबन आवताडे व भगीरथ दादा भालके यांच्या हस्ते त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रभाकर नाना हावळे शिवशैल भैय्या  हावळे महादेव गोडसे धर्मराज पुजारी सुनील पुजारी किशोर दत्तू अमोल माळी पप्पू दत्तू रघु चव्हाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते व सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते पदाधिकारी यांनी प्रभाकर भैय्या देशमुख यांना वाढदिवसानिमित्त फोनवरून काहींनी प्रत्यक्ष भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक चंद्रकांत निकम नाना मोरे अमोल पाटील विकास जाधव गोपीनाथ वराडे विनायक भोसले शिवशैल हावळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages