गोंधळी समाजाने व्यक्त केली खंत: कुणीही उठून करू लागले जागरण गोंधळ: - संभाजी शिंदे
.png)
.png)
कुरुल (कटूसत्य वृत्त):- कोरोना संकटामुळे दोन वर्षे लग्नसराई मंदावल्यामुळे चालू वर्षी लग्नसराई जोमात चालू आहे. परंतु लग्नसाराई नंतर गोंधळ घालायला गोंधळी मिळेना.
लग्नानंतर कुलदैवतेचा गोंधळ घालण्याची पद्धत परंपरेनुसार चालू आहे . जागरण गोंधळ करण्यासाठी जातीवंत गोंधळी व मुरळी आवश्यक आहे. जातीवंत वाघ्या मुरळी त्यांच्या तारखा बुक असल्यामुळे त्यांना तारखा मिळत नसल्याने इतर समाजाचे लोक या व्यवसाय करत असल्याने भरमसाठ पैसे घेऊ लागले आहेत. लग्नानंतर कुलदैवतेचा गोंधळ घालण्याची परंपरा आहे यासाठी जातीवंत गोंधळी पार्टी चा शोध घेतला जात होता. या कार्यक्रमासाठी जवळ असेल 12000 सुपर घेतली जायची या कार्यक्रमासाठी सात माणसाची पार्टी असायची ,परंतु आता सोशल मीडिया युट्युब वर इतर समाजाचे लोक कार्यक्रमाच्या क्लिपा युट्युब वर पोस्ट करत असून ते कृपा पाहून युवक वर्ग त्यांनाच पसंती देत आहे. जागरण गोंधळ करण्यासाठी इतर समाजातील लोक करत असल्यामुळे जागरण गोंधळा आर्केस्ट्रा प्रमाणे केला जात असून त्याची सुपारी 20 ते 40 हजार घेतली जाते, देवाधिकांची गाणी सोडून हिंदी मराठी चित्रपटातील गाणी म्हणून जागरण गोंधळ घातला जातो.युवक वर्ग होत आहे आकर्षित होत आहे.
- आता सिनेमाच्या गाण्यावर ती वाघ्या मुरळी यांचा रात्रभर गोंधळ असतो याची मीडियावर मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी होते त्यामुळे युवक वर्ग आकर्षित केला जातो. श्री मार्तंड वाघ्या मुरळी पार्टी चे प्रमुख बापू लंबाटे कुरुल
- आम्ही जातिवंत गोंधळी असताना आम्ही मीडिया वरती प्रसिद्धी पासून दूर आहोत.सध्या मात्र खरं गोंधळी असणर्या समाजावर उपासमारीची वेळ येईल. ज्यांना चा गंध ही नाही. भरमसाठ पैसे घेऊन लोकांना फसवत आहे. आम्हाला गोंधळ घालण्याची देवा पासूनच परवानगी आहे: जय तुळजाभवानी वाघ्या मुरळी पार्टी प्रमुख संभाजी शिंदे
No comments:
Post a Comment