कारकल येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन व विविध विकास कामाचे भूमीपूजन
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कारकल ता.द.सोलापूर येथे पुण्यश्लोक राष्ट्रमाता,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन व विविध विकास कामाचे भूमीपूजन समारंभानिमित्त श्री.अभिनव पुंडलिंगेश्वर महाराज श्रीक्षेत्र गोळसर यांच्या दिव्य सानिध्यात देशाचे माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,शहर मध्यच्या विदयमान आमदार प्रणिती शिंदे,सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते,एम.के.फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे,सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते चेतन नरोटे,सो.म.पा.नगरसेवक बाबा मिस्त्री,सो.कृ.बा.समितीचे संचालक वसंतराव पाटील व दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरिष पाटील यांच्या उपस्थित सपंन्न झाला.
यावेळी सो.म.पा.नगरसेवक शैलेश पिसे,सुशिल बंदपट्टे,जि.प.सदस्य सौ.प्रभावती पाटील,विदयमान सरपंच सौ.सुजाता देशमुख,उपसरपंच सिध्दाराम हंजगी,मा.पं.समिती सदस्य श्री.विठ्ठल पाटील,जि.प.माजी सभापती अशोक देवकते,जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील,दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड.रविकांत पाटील,सादेपूरचे सरपंच आप्पासाहेब चितापूरे,लवंगी सरपंच संगमेश बगले-पाटील,औज सरपंच सौ.रकुमाबाई बन्ने,मद्रे चेरमन जगदेव व्हनमाने,भंडारकवठेचे सरपंच चिदानंद कोटकोंड,कारकलचे माजी सरपंच अमोगसिध्द देशमुख, मा.सरपंच रामचंद्र देशमुख,मा.पं.समिती सदस्या सौ.शैलजा देशमुख,राजुरचे उपसरपंच सतिश देवकते,कांचन फाऊंडेशनचे कारकल शाखा अध्यक्ष सोमनिंग देशमुख,मलकरी देशमुख,लालासाब मुल्ला,राचय्या स्वामी,प्रदीप बदंलगी नूरअहमद नालमवार कल्याणराव चौधरी आकाश तिपरादीआणि कारकल पंचक्रोशितील सरपंच-उपसरपंच,कारकलचे सर्व ग्रा.पं.सदस्य,आणि हजारो संख्येने कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,आमदार कु.प्रणिती शिंदे,सुदीप चाकोते,सो.म.पा.गटनेते चेतन नरोटे, सरपंच अमोगसिध्द देशमुख,अशोक देवकते,अॅड.रविकांत पाटील यांची भाषणे झाली.
No comments:
Post a Comment