विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलद्वारा मोफत मार्गदर्शन शिबीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलद्वारा मोफत मार्गदर्शन शिबीर

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या  वाढदिवसानिमित्त पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलद्वारा मोफत मार्गदर्शन शिबीर

               अकलूज (कटूसत्य वृत्त):- धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असून त्याचा परिणाम भविष्यात आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे वेळीच तपासणी केल्यास या आरोग्यविषयक समस्यांना आळा घालणे शक्य होते. यानुषंगाने पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलच्या वतीने सोमवारी १३ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत अकलुज येथील अपेक्स हॉस्पीटल येथे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

               या शिबीरात डॉक्टरांचा सल्ला, रॅंडम ब्लड शुगर, रक्तदाब तपासणी, बॉडी कंम्पोझिशन एनेलिसीस तपासणी करण्यात येणार आहे.

               या उपक्रमाला डॉटर मॉम फाऊंडेशन, शिवरत्न फाऊंडेशन, विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग एण्ड मेडिकल रिसर्चइन्स्टीट्युट, अकलूज, इंडियन मेडिकल असोसिएशन अकलुज यांचा विशेष सहयोग लाभला आहे. पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलचे कन्सलटंट लेप्रोस्कोपीक सर्जन आणि बेरिएट्रीक सर्जन डॉ केदार पाटील यांचे मोफत मार्गदर्शन आणि सल्ला याठिकाणीदिला जाणार आहे. हर्निया, लठ्ठपणा, पित्ताशयातील गाठी यावरही तज्ञांचे मार्गदर्शन घेता येणार आहे तसेच सवलतीच्या दरातशस्रक्रिया उपलब्ध होतील.

दिनांक – १३ जून २०२२
वेळ – सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत
स्थळ – अपेक्स हॉस्पिटल, बेसमेंट, बायपास रोड, अकलूज
नोंदणी शुल्क- ५०/-
पुर्व नोंदणीसाठी संपर्क - 8888216756

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages