हजारों शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

हजारों शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

हजारों शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

             अकलूज (कटूसत्य वृत्त):- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात,शिस्तीत आणि भक्तीमय वातावरणात शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिराच्या परिसरात साजरा झाला.यावेळी हजारों शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

             सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखानाचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी या सोहळ्याचे अत्यंत सुंदर, सुरेख, आणि आकर्षक नियोजन केले होते.सुंदर अशा सोहळ्याने पूर्ण रस्ता व्यापला होता.मन प्रसन्न करणारी बैठक व्यवस्था,तर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम नजरेत सामावून घेण्यासाठी लावण्यात आलेल्या स्क्रीन,हे देखण्या सोहळ्याची रूपरेषा दर्शवित होते.

             मनाला भावनारे मंत्रोच्चार, शाहिरी पोवाड्यांचा जल्लोष, आणि तेवणाऱ्या हजारो मशालीमुळे दैदिप्यमान आणि नेत्रसुखद सोहळा हा मोठा उत्सव ठरला.तर शिवपार्वती मंदिराच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुतळा खाली मंदिराच्या भव्य प्रांगणात बसविण्यात आला. अत्यंत सुंदर आणि नयनरम्य बगीच्या करीत, सहकार महर्षी कारखान्याने शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराच्या बाहेरच्या आवारात पुतळ्याची पुनर्स्थापना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या साक्षीने व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत केली.यावेळी नंदिनीदेवी मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील,  धैर्यशील मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील उपस्थित होते. तर हजारों शिवभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

             महापुरुष समाजासाठी आदरस्थानी पूजनीय आहेत.पण त्यांच्या कार्यक्रमात डॉल्बीच्या तालावर हिडीसपणा केला जातो. महापुरुषांचे कार्यक्रम साजरे होतात तेव्हा त्यांच्या कार्याला त्यागाला स्मरुण, त्यांच्या आदर्शाचे आचरण करावे.

             महापुरुष डोक्यावर घेऊन नाचण्यासारखे नव्हे तर डोक्यात घेऊन जगण्यासारखे व्यक्तिमत्व आहे. समाजामध्ये आदर्श समाज निर्माण होईल असे कार्यक्रम करावेत. - जयसिंह मोहिते पाटील (चेअरमन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages