सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय शंकरनगर- अकलूज येथे पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे सुविधा केंद्र उपलब्ध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय शंकरनगर- अकलूज येथे पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे सुविधा केंद्र उपलब्ध

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय शंकरनगर- अकलूज येथे पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे सुविधा केंद्र उपलब्ध

             अकलूज (कटूसत्य वृत्त):- राज्य समाईक प्रवेश कक्षामार्फत  पदविका अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीयभूत पध्दतीने राबविली जात आहे.विद्यार्थ्यांना पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी नाव नोंदणी व अर्ज निश्चिती करता यावी.याकरीता राज्य समाईक प्रवेश कक्षा मार्फत सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च,शंकरनगर- अकलूज या महाविद्यालयास पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ च्या सुविधा केंद्रास ( FC Centre ) मान्यता देण्यात आलेली आहे.सुविधा केंद्र दि .०४/०६/२०२२ पासून सुरू झालेले आहे.सुविधा केंद्राचा क्रमांक FC6782 असा आहे.सदर सुविधा केंद्रामध्ये प्रथम तसेच थेट व्दितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी व अर्ज निश्चिती करता येणार आहे . सुविधा केंद्र सकाळी ० ९ .३० ते सायंकाळी ०५.३० या वेळेमध्ये सर्व दिवशी चालू राहणार आहे.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.इंद्रजीत यादव यांनी दिली.यावेळी सुविधा केंद्रप्रमुख प्रा.उदयकुमार फुले व प्रा.स्वप्नील निकम तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

             ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शहरांच्या ठिकाणी जावे लागत होते. अशा विद्यार्थ्यांना अकलूजमध्येच सर्व सोयी मिळाव्यात या हेतूने सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयास सुविधा केंद्राची मंजुरी मिळालेली आहे.तरी अकलूज व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages