स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली जवळा विकास सेवा सोसायटी निवडणूक दिपकआबा यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली जवळा विकास सेवा सोसायटी निवडणूक दिपकआबा यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली जवळा विकास सेवा सोसायटी निवडणूक दिपकआबा यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध

स्वातंत्र्यपूर्व काळापासून बिनविरोधाची व 100% वसुलीची परंपरा कायम: राष्ट्रवादी व शेकाप आघाडी

महाराष्ट्र राज्यातील पहिल्या तीन क्रमांकामध्ये जवळा विकास सेवा सोसायटीचा क्रमांक

            सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोला तालुक्याचे माजी आमदार कै.काकासाहेब साळुंखे-पाटील व कै.अण्णासाहेब घुले (सरकार) तसेच कै.शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्यानंतर 40 वर्षापासून दीपकआबा यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यपूर्व काळापासून जवळा विकास सेवा सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखण्याचं काम महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा माजी विधानपरिषद सदस्य दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आजतागायत केल आहे. यामुळे जवळा गावातील राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षाची आघाडी असल्याने येथील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

            दिपकआबा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या जीवनातील परिवर्तन घडविणाऱ्या जवळा विकास सेवा सोसायटीचा 100% वसुली ची परंपरा कायम राखल्याने जवळा विकास सेवा सोसायटीचा महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिक असून, सबंध महाराष्ट्रामध्ये पिग्मी गोळा करणारी एकमेव सोसायटी तसेच गोल्ड लोन तीन तासाच्या आत उपलब्ध करून देऊन राज्यातील एक आदर्श विकास सेवा सोसायटी होण्याचा मान जवळा विकास सेवा सोसायटीला निश्चितपणे दिपकआबा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला आहे. जवळा विकास सेवा सोसायटीची सुसज्ज इमारत असल्याने भविष्य काळामध्ये संस्थेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन विकास सेवा सोसायटी पूर्णत्वाला नेणार असल्याचा मानस दिपक आबा यांनी यावेळी बोलताना सांगितला.भविष्यकाळातही जवळा विकास सेवा सोसायटीची सुसज्ज अशी इमारत उभा करून संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची कामे करणार असल्याचा मानस दिपकआबा यांनी यावेळी बोलताना सांगितला. 

            गेली चाळीस वर्ष पक्ष पार्टी न पाहता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विकास सेवा सोसायटीची भूमिका ही अग्रेसर असते.सर्व पक्षांना एकत्रित घेऊन संस्थेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी ठेवण्याचं काम संस्थेचे सचिव हेमंत कुलकर्णी यांच्या कार्यकुशल कामामुळे होत असून शेतकऱ्यांना मागेल तेव्हा कर्ज याची तंतोतंत पणे पूर्तता होत असल्याने संस्थेच्या सचिवांचा या संस्थेमध्ये सिंहाचा वाटा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages