जलसंपदा तथा पाटबंधारे मंत्री महोदय यांची भेट घेऊन शेतीच्या पाण्याचा अनेक वर्षांचा प्रश्न तातडीने सोडवणार : आ.दिपकआबा साळुंखे पाटील

वंचित गावांना शेतीचे पाणी मिळण्यासाठी सर्व पक्षीय बैठक संपन्न
सांगोला (कटुसत्य वृत्त): जवळा ,घेरडी,वाकी घेरडी,पारे ,वाणी चिंचाले, भोपसेवाडी ,आगलावेवाडी व तरंगेवाडी या पाण्यापासून वंचित असलेल्यास गावाना म्हैसाळ, टेम्भू,निरा भाटघर या विविध योजनेतून निधी मिळवून या गावासाठी नवीन सुधारित आराखडा तयार करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गावातील सर्व पक्षीय नेते मंडळी, शेतकरी व संबंधित योजनेच्या प्रमुख अधीकारी यांच्या समवेत श्री क्षेत्र नारायण देव मंदिर जवळा येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्व गावनिहाय ज्या गोष्टी कराव्या लागतील या बाबत संबंधित लोकांनी लेखी स्वरूपात आपल्या सूचना या द्याव्यात असे आवाहन मा.दिपक आबांनी केले.त्या नंतर वरील गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून आप आपल्या गावातील समस्या व काय करावे लागेल या बाबत माहिती दिली.या सर्व सूचना चा समावेश करून नवीन सुधारित आराखडा तयार करून तो मा.जलसंपदा मंत्री श्री .जयंत पाटील साहेब यांना सादर करून तो आराखडा मंत्री मंडळाच्या मान्यतेने मंजूर करून या वंचित गावांना लवकरात लवकर न्याय देण्याचे आश्वासन व निर्धार श्री नारायण देवाच्या साक्षीने मा.दिपक आबांनी व्यक्त केला .सर्व अधिकारी यांना आलेल्या सर्व सूचना चा समावेश करून एक चांगला असा सर्वसमावेशक आरखडा तयार करावा त्या आरखड्याला मंत्री मंडळातून मंजुर करून आणण्याचा निर्धार मा.दिपक आबा यांनी व्यक्त केला.या बैठकी मुळे वंश परंपरागत दुष्काळात असणाऱ्या जवळा परिसरातील या गावातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत .मा.आबा विकास कामात कुठल्याही प्रकारचा पक्षीय भेदाभेद करत नाहीत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची भावना उपस्थित लोकांनी बोलून दाखवली. या योजनांना कितीही निधी लागला तर तो मा.दिपक आबाच आणू शकतील असा विश्वास उपस्थित सर्व शेतकरी व नेते मंडळी नी व्यक्त केला .या बैठकीस जवळा,घेरडी,पारे,वाकी घेरडी,वाणी चिंचाले,भोपसेवाडी,तरंगेवाडी आणी आगलावेवाडी चे सर्व पक्षीय नेते मंडळी व शेतकरी उपस्थित होते.
स्वातंत्र मिळाले पासून कुठल्याही पाणीपुरवठा योजनेत समावेश नसणाऱ्या वाकी (घेरडी) व वाणी चिंचाले या गावांचा म्हैसाळ च्या योजनेत समवेश झाला असून त्या संदर्भात पाणी कसे पोहवायचे या बाबत संबंधित अधिकारी यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना मा.दिपक आबांनी दिल्या.
No comments:
Post a Comment