स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे : वैभव शिंदे

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोशल मीडिया व स्मार्टफोन पासून दूर राहिले पाहिजे असे मत नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये राज्यातून सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वैभव शिंदे यांनी टेंभुर्णी प्रेस क्लब वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की टेंभुर्णी व परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी इथून पुढे परिसरातील राजकारणी व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन जास्तीत जास्त मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने वैभव शिंदे व त्यांचे वडील भाऊसाहेब शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रम जगदंबा वेणेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे, जेष्ठ पत्रकार डी.एस. गायकवाड,शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, राष्ट्रवादीचे नेते रावसाहेब देशमुख, डॉ.राहुल पाटील,प्रहारचे दत्तात्रय मस्के, रिपाइंचे जयवंत पोळ, अमोल जगदाळे, अँड संतोष कानडे, यांची भाषणे झाली.
यावेळी प्रमुख उपस्थित मध्ये भाऊसाहेब शिंदे, चव्हाणवाडी सोसायटीचे नुतन संचालक सुभाष इंदलकर, राहुल चव्हाण, शिवसेनेचे तालुकाउपप्रमुख प्रशांत सोनवणे, डॉ मामासाहेब पाडुळे, सागर क्षिरसागर,भारत जगताप व टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल जगताप, उपध्यक्ष सतिश चांदगुडे, जेष्ठ पत्रकार सदाशिव पवार, संतोष पाटील, सोपान ढगे,सुहास साळुंखे, हरीचंद्र गाडे सर, सतिश काळे,सुभाष चव्हाण, गणेश चौगुले, धनंजय भोसले, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्तावित धनंजय मोरे यांनी तर सुत्रसंचालन सुरज देशमुख, व अभार सचिन होदाडे यांनी केले.
No comments:
Post a Comment