कन्हेरगांव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी लिंबाजी मोरे तर व्हॉइस चेअरमन पदी उमेश डोके यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

कन्हेरगांव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी लिंबाजी मोरे तर व्हॉइस चेअरमन पदी उमेश डोके यांची निवड

कन्हेरगांव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी लिंबाजी मोरे तर व्हॉइस चेअरमन पदी उमेश डोके यांची निवड

               टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): कन्हेरगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी लिंबाजी नागनाथ मोरे यांची तर व्हॉइस चेअरमन पदी उमेश दिलीप डोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

               कन्हेरगांव  सोसायटीची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली होती.या निवडणुकीत समन्यायी विकास पॅनेलने विरोधी पॅनल चा मोठ्या मताधिक्क्याने 13/0 असा पराभव करत धुवा उडवला होता. सोसायटी अध्यक्ष पदासाठी लिंबाजी मोरे तर उपाध्यक्षपदासाठी उमेश डोके यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस बी शिंगाडे यांनी केली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी कनेरगाव चे माजी उपसरपंच शरद डोके, हरितक्रांती पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन किसन खोचरे ,व्हाईस चेअरमन पोपट केदार ,उपसरपंच दिपक डोके,बळीराजा शेतकरी संघटनेचे बाबुराव डोके ,राजेंद्र डोके,तंटामुक्त समितीचे विकास पाटील,आदी उपस्थित होते यावेळी नूतन संचालक माजी उपसरपंच दत्तात्रय माने, रामलिंग खोचरे, जयवंत पाटील, दत्तात्रय डोके ,मारुती काशीद, महावीर मोरे ,सुमन केदार, मंगल भरगंडे,अण्णा वजाळे,भारत गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी.शिंगाडे व सचिव देविदास डोके यांनी कामकाज पाहिले.

               चेअरमनपदी लिंबाजी मोरे व व्हाईस चेअरमनपदी उमेश डोके यांची निवड झाल्याबद्दल आ.बबनराव शिंदे, आ.संजयमामा शिंदे ,जिल्हा दुधसंघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages