मोबाइल दुकानात चोराने अवघ्या ३७ मिनिटांत ८ लाख रुपये किमतीचे महागडे मोबाइल आणि १ लाख ३५ हजारांची रोकड पळविली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

मोबाइल दुकानात चोराने अवघ्या ३७ मिनिटांत ८ लाख रुपये किमतीचे महागडे मोबाइल आणि १ लाख ३५ हजारांची रोकड पळविली

मोबाइल दुकानात चोराने अवघ्या ३७ मिनिटांत ८ लाख रुपये किमतीचे महागडे मोबाइल आणि १ लाख ३५ हजारांची रोकड पळविली

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मोबाइल गल्लीतील एस. एस. मोबाइल दुकानात चोराने अवघ्या ३७ मिनिटांत आठ लाख रुपये किमतीचे महागडे मोबाइल आणि १ लाख ३५ हजारांची रोकड पळविली. हा प्रकार सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास झाला आहे.चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.शटरचा मधला भाग वाकवून चोर दुकानात आले. याबाबत अशोक आहुजा यांनी फौजदार चावडी पोलिसात प्राथमिक माहिती दिली आहे.एस.एस. मोबाइल हे दुकान अहुजा हे चालवतात. ओपो आणि विवो या कंपनीचे महागडे ४५ मोबाइल चोरीला गेले आहेत. किमान १५ ते ४० हजार किमतीचे मोबाइल होते. सुरुवातीला एक जण आत आला. थोड्या वेळाने एका पाठोपाठ दोघेजण आले. ड्राव्हरमधून १ लाख ३५ हजार रुपये काढून घेतले. शोकेसमध्ये ठेवलेले ते ४२ ते ४५ महागडे मोबाइल (विवो, ओपो कंपनीचे) चोरीला गेले आहेत, अशी माहिती विशाल आहुजा यांनी दिली. चोरी करताना बॅटरीचा प्रकाश पाडला. सोलापुरात एस. एस. मोबाइल शॉपीच्या चार ते पाच शाखा आहेत. कोल्हापूर मुख्य दुकान आहे. मोबाइल गल्लीतील सलगर कॉम्प्लेक्समध्ये हे दुकान आहे. याबाबत विशाल आहुजा म्हणाले, पहाटे अडीचच्या सुमारास चोर आले आणि तीन वाजून सात मिनिटांनी चोरी करून गेले. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शटरचा मधला दरवाजा वाकवून आत आले आहेत.प्राथमिक माहितीनुसार ४३ ते ४५ मोबाइल आणि पैसे नेले आहेत. पोलिसांना प्राथमिक माहिती दिली आहे. पोलिस निरीक्षक विकास देशमुख म्हणाले, चोरीनंतर पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. ते मंगळवारी तक्रार देणार आहेत असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages