सोलापूर विद्यापीठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवज्योत रॅली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 7, 2022

सोलापूर विद्यापीठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवज्योत रॅली

सोलापूर विद्यापीठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवज्योत रॅली

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवज्योत रॅली काढण्यात आली.शिवजयंती रॅलीमध्ये शहरातील संगमेश्वर, वालचंद, दयानंद, डी. ए. व्ही. वेलणकर, वसुंधरा कॉलेज, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ आणि छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील एनएसएस आणि क्रीडा विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे एक हजार विद्यार्थी व कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.प्रारंभ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते छ. शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवज्योत रॅलीचे उद्घाटन झाले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages