महापालिका परिवहन विभाग मार्गाचे खासगीकरण निविदा विभागाने काढली

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका परिवहन विभाग मार्गाचे खासगीकरण निविदा विभागाने काढली असून, शहरासह हद्दवाढ आणि बाहेरच्या भागातील २० किमी अंतराचे मार्गावर खासगीकरण करण्यात येणार अाहे.नामांकित कंपनी व कत्राटधारांसाठी स्पर्धात्मक दर मागवण्यात आले आहे. ७ जुलै अंतिम तारीख आहे.शहरातील पूर्व भाग वगळता अन्य मार्गाचे खासकीरणावर राॅयल्टी पध्दतीने चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे.१ जुलैनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. टेंडरपूर्व बैठक १३ जून रोजी इच्छुकांसाेबत होणार आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली. शहरातील चार भाग करण्यात येणार आहे. त्यापैकी तीन भागातील मार्ग राॅयल्टी घेऊन चालवण्यासाठी देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment